IND vs WI 2nd ODI: किरोन पोलार्ड याने जिंकला टॉस, भारताची पहिले बॅटिंग; टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एक बदल
या मॅचमध्ये वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्ड याने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमच्या स्टेडियममध्ये थोड्याच वेळात सुरु होईल. या मॅचमध्ये वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. मागील मॅचमधून वनडेत पदार्पण करणाऱ्या शिवम दुबे (Shivam Dube) याला बाहेर करण्यात आले असून वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) याला संधी देण्यात आली आहे. विंडीजच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. सुनील अंब्रिसला वगळले आहे त्याच्या जागी एव्हिन लुईस (Evin Lewis) आणि हेडन वॉल्श जुनिअरच्या जागी खारी पियरे (Hayden Walsh Jr.) ला स्थान मिळाले आहेत. यापूर्वी झालेल्या सामन्यात विंडीजने 8 विकेटने विजय मिळवला होता आणि मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली. आता टीम इंडियासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. आजच्या सामन्यात पराभव म्हणजे मालिका पराभव. दुसरीकडे, विंडीज आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करतील. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या रेसमध्ये सामिल झाला हा वेस्ट इंडियन फलंदाज, 2019 चा किंग बनण्यासाठी देतोय कठीण लढत)
चेन्नईतील मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निराश केले. सुनील अंब्रिस आणि शिमरोन हेटमेयर यांच्याऐवजी भारतीय गोलंदाजांना अन्य कोणत्याही विंडीज फलंदाजाला बाद करण्यात यश आले नाही. शिवाय, मागील मॅचमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शमी यांनीच या विंडीज फलंदाजांना माघारी धाडले होते. दुसरीकडे, विंडीजसाठी आजचा सामना जिंकून 17 वर्षानंतर भारताला त्यांच्याच घरात पराभूत करण्याची सुवर्ण संधी आहे. 2002-03च्या सात सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजने भारताला 4-3 ने पराभूत करत विजय नोंदवला होता. विंडीज फलंदाज हेटमेयर आणि शाई होप यांनी यापूर्वीच्या मॅचमध्ये शानदार शतकी खेळी केली होती, आणि संघाला विजय मिळवून दिला होता. आजदेखी त्यांच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल.
असा आहे भारत-विंडीजचा प्लेयिंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.
वेस्ट इंडिज: एव्हिन लुईस, शाई होप, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि खारी पियरे.