IND vs WI 2nd ODI: विराट कोहली-श्रेयस अय्यर यांची महत्वपूर्ण खेळी, वेस्ट इंडिजला विजयासाठी 280 धावांचे आव्हान

भारत-वेस्ट इंडिज मधील दुसऱ्या वनडे सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने विंडीजला विजयासाठी धावांचे 280 लक्ष्य दिले आहेत. आजच्या या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या जबरदस्त खेळी करत आपले 42 वे शतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत विराटला चांगली साथ दिली.

विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारत (India)-वेस्ट इंडिज (West Indies) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने विंडीजला विजयासाठी धावांचे 280 लक्ष्य दिले आहेत. आजच्या या सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या जबरदस्त खेळी करत आपले 42 वे शतक पूर्ण केले. अखेर 42व्या ओव्हरमध्ये 125 चेंडूत 120 धावा करत विराट बाद झाला. विश्वचषकमध्ये विराटला एकही शतक करता आले नव्हेत. त्यामुळे, तब्बल दोन महिन्यानंतर विराटने शतकी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) स्वस्तात बाद झाल्यावर त्याला पाचव्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने अर्धशतकी खेळी करत विराटला चांगली साथ दिली. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहलीचा सौरव गांगुलीला दे धक्का, एकाच सामन्यात स्थापित केले अनेक रेकॉर्ड)

आजच्या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सलामीच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या शिखर धवन याला केवळ 2 धावा करता आल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये शेल्डन कॉटलर याने शिखरला बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटने 14व्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत आपलं अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्यानंतर विराट आणि रोहितने 74 धावांची भागिदारी केली आणि संघाचा डाव सावरला. मात्र रोहितला 34 चेंडूत फक्त 18 धावा करता आल्या. दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर आलेला रिषभ पंत यानेदेखील निराशा केली आणि 20 धावा करत बाद झाला.

त्यानंतर श्रेयस अय्यर याने कोहलीला चांगली साथ दिली. कोहली बाद झाल्यावर देखील अय्यर आक्रमक खेळी करत राहिला. आणि 71 धावा करत माघारी परतला. विराट आणि अय्यरने 125 धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठी धाव संख्या उभारण्यास मोठे योगदान दिले.  वेस्ट इंडिजसाठी कार्लोस ब्राथवेट याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने कोहली आणि पंतला माघारी धाडले. शेल्डन कॉटरेल, रोस्टन चेस आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला,

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement