IND vs WI 2nd ODI: किरोन पोलार्ड, विराट कोहली यांचा 'गोल्डन डक'; रोहित शर्मा याची दमदार खेळी; विशाखापट्टणम स्टेडियममध्ये रचले गेले अनेक विक्रम 

या मॅचमध्ये रोहित, राहुल, विराट आणि काही विंडीज खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपण पाहूया इथे

विराट कोहली आणि किरोन पोलार्ड (Photo Credits: Getty Images)

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 107 धावांनी पराभूत केले. भारताच्या (India) 387 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा डाव 280 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडीजकडून शाई होप (Shai Hope) याने 78 आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) याने 75 धावा केल्या, पण भारताची धावसंख्या पार करण्यासाठी या धावा पुरेश्या नव्हत्या. भारताकडून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने हॅटट्रिक केली, त्याने 33 व्या षटकात सलग तीन चेंडूंमध्ये शी होप, जेसन होल्डर आणि अलझारी जोसेफ यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. यापूर्वी, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिले फलंदाजी करत भारताने 50 षटकांत 5 विकेट्स गमावून 387 धावांचे लक्ष्य उभारले. केएल राहुल (KL Rahul) 102, रोहित शर्मा (Rohit Sharma) 159 धावा केल्या. कुलदीपसह मोहम्मद शमी यासह 3 गडी बाद केले तर रवींद्र जडेजा याने दोन गडी बाद केले. भारताच्या विजयासह मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. (IND vs WI 2nd ODI: कुलदीप यादव याने घेतली हॅटट्रिक, वेस्ट इंडिजवर 107 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत 1-1 ने केली बरोबरी)

दरम्यान, या मॅचमध्ये रोहित, राहुल, विराट आणि काही विंडीज खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपण पाहूया इथे:

1 रोहित-राहुलची भागीदारी

रोहित आणि राहुलने भारताच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. रोहित-राहुलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोंघांनी पहिल्या विकेटसाठी रेकॉर्ड भागीदारीची नोंद केली. रोहित आणि राहुलने विंडीजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक 227 धावांची भागीदारी रचली. यासह रोहित-राहुलची जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी नोंदविणारी पहिली भारतीय जोडी बनली. पहिल्या विकेटसाठी वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही भारतीय जोडीने केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.

2 रोहित बनला शतकारांचा किंग

रोहितने पुन्हा एकदा या सिद्ध केले कि तो शतकारांचा राजा आहे. रोहित वर्ष 2019 मध्ये त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. रोहितने एका कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक शतकारांचा आपलाच रेकॉर्ड मोडला. या मॅचमध्ये रोहितने 5 एकूण षटकार लागावले. यासह रोहितने यंदा एकूण 77 षटकार लागले आहेत.

3 रोहितचे 7 वे वनडे शतक 

रोहितने वेस्ट विंडीजविरुद्ध शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. रोहितने प्रभावी 159 धावांची खेळी केली. रोहितचेहे यंदाचे 7 वे वनडे शतक आहे. यापूर्वी, रोहितने विश्वचषकमध्ये सलग 5 शतकं केली होती.

4 एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी पुन्हा एका त्यांचा शानदार फॉर्म कायम ठेवत तुफान खेळी केली. रोस्टन चेस याच्या एका ओव्हरमध्ये अय्यर आणि पंतने 31 धावा केल्या. यासह त्यांनी सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा यांचा रेकॉर्ड मोडला. तेंडुलकर-जडेजाच्या जोडी वर्ष 1999 मध्ये 28 धावा केल्या होत्या.

5 सलामी फलंदाजाने केलेली सर्वाधिक शतकं 

रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध 28 वे वनडे शतक केले. रोहितचे सलामी फलंदाज म्हणून 26 वे शतक होते. यासाठी त्याने क्रिस गेल याला मागे टाकले. गेलने सलामी फलंदाज म्हणून 25 शतकं केली आहेत.

6 एका कॅलेंडर इयरमधील सर्वाधिक शतकं

रोहितचे यंदाचे हे वर्ष 2019 मधील 10 शतक आहेत. रोहितने वनडेत 7 आणि टेस्टमध्ये तीन शतकं केली आहेत.

7 विंडीजविरुद्ध धावांच्याबाबतीत सर्वाधिक धावा

भारताने या मॅचमध्ये विजय मिळवत विंडीजविरुद्ध पाचवा सर्वात मोठा विजय नोंदवला. भारताने विंडीजला 107 धावांनी पराभूत केले. भारताने यापूर्वी विंडीजला 2018 मध्ये मुंबई मॅचमध्ये 224, 2007 बरोडामध्ये 160, 2011 इंदोरमध्ये 153 आणि 2019 मँचेस्टरमध्ये 125 धावांनी पराभूत केले होते.

8 चौथी सर्वात मोठी भागीदारी

रोहित आणि राहुलने नोंदवलेली ही चौथी मोठी भागीदारी आहे. रोहित आणि राहुलने 227 धावांची भागीदारी केली.

9 दोन्ही कर्णधार शून्यावर बाद

पहिल्यांदाच वनडे सामन्यात विराट आणि पोलार्ड, दोन्ही कर्णधार गोल्डन डकवर बाद झाले. विराट आणि पोलार्ड दोघे पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतले. शिवाय, वनडे सामन्यात दोन्ही कर्णधारांनी शून्यावर बाद होण्याची ही 12 वी घटना आहे.

दोन्ही संघातील मालिका 1-1 ने आता बरोबरीत आली आहे. त्यामुळे आता विजयी संघाचा निर्णय आसामच्या कटक स्टेडियममध्ये 22 डिसेंबरला घेण्यात येईल. विंडीजकडून होपने सर्वाधिक 78 आणि निकोलस पूरन याने 75 धावांची खेळी केली. एव्हिन लुईस याने 30 धावांचे योगदान दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif