IND vs WI 1st Test: अँटिगामध्ये पहिली टेस्ट जिंकत विराट कोहली याला एम एस धोनी याच्या 'या' मोठ्या रेकॉर्डची बरोबरी साधण्याची संधी, वाचा सविस्तर
धोनीच्या नेतृत्वात भारताने 60 पैकी 27 सामने जिंकले, हा भारतीय विक्रम आहे. कोहलीने आतापर्यंत 46 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून त्यापैकी त्याने 26 विजय मिळवले.
टी-20 आणि वनडे मालिकेनंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि संघ आता टेस्ट मालिका काबीज करण्याच्या निर्धारित असेल. भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील पहिली टेस्ट 22 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. हा सामना अँटिगाच्या (Antigua) सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळाला जाईल. विंडीजविरुद्द्ध भारतीय सांघाचे आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता, टेस्ट मालिका त्यांना जास्त कठीण नसेल असे दिसत आहे. टी-20 आणि वनडे मालिकेत कर्णधार विराट कोहली याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा निघाल्या. विश्वचषकमधील आपला फॉर्म कायम ठेवत विराटने कॅरेबियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. वनडे मालिकेत त्याने दोन शतक देखील केले. आणि आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली फलंदाज आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रमांची नोंद करू शकतो. (IND vs WI Test 2019: टेस्ट मालिकेत रवींद्र जडेजा विक्रमाच्या उंबरठ्यावर, आर अश्विन सह 'या' Elite List मध्ये सहभागी होण्याची संधी)
गुरुवारी सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल एम एस धोनी (MS Dhoni) याच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो. धोनीच्या नेतृत्वात भारत प्रथमच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. त्यांच्या नेतृत्वात भारताने 60 पैकी 27 सामने जिंकले, हा भारतीय विक्रम आहे. कोहलीने आतापर्यंत 46 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून त्यापैकी त्याने 26 विजय मिळवले. आणि जर टीम इंडियाने टेस्ट मालिके 2-0 फरकाने जिंकली तर कोहली कर्णधार कूल धोनीला मागे सारत भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार होईल.
कोहलीने प्रथम भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीला कसोटी संघाची कमान देण्यात आली होती. कोहलीने आजवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये भारताला विजय मिळवून दिला. मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटीत कोहलीने विजय मिळवून देत ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पहिल्यांदा टेस्टमध्ये विजय मिळवण्याचा दुष्काळ संपवला होता.