IND vs WI 1st Test: पहिल्या मॅचपूर्वी नवीन टेस्ट जर्सीमध्ये टीम इंडियाने केला खास फोटोशूट, पहा हे Photos

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने विंडीजविरूद्ध टेस्ट मालिकेपूर्वी खेळाडूंसाठी नवीन जर्सी लाँच केली. आयसीसीने टेस्ट क्रिकेटच्या जर्सीमध्ये केलेल्या बदलांनुसार टीम इंडियाच्या या जर्सीवर त्यांचे नाव आणि क्रमांक लिहिलेले आहेत.

(Photo Credit: indiancricketteam/Instagram)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील दोन कसोटींच्या मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दोन्ही संघांचा पहिला सामना असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने (BCCI) विंडीजविरूद्ध होणाऱ्या 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेपूर्वी खेळाडूंसाठी नवीन जर्सी लाँच केली. आयसीसीने (ICC) टेस्ट क्रिकेटच्या जर्सीमध्ये केलेल्या बदलांनुसार टीम इंडियाच्या या जर्सीवर त्यांचे नाव आणि क्रमांक लिहिलेले आहेत. याआधी भारतीय संघाने ही नवीन जर्सी परिधान करत विंडीज ए संघाविरुद्ध सराव सामन्यात भाग घेतला होता. पण आता कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनी या जर्सीमध्ये एक खास फोटोशूट केलाय. रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि कुलदीप यादव यांच्यासह काही इतर खेळाडूंनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच व्हायरल झाले आहेत. (IND vs WI 1st Test: रोहित शर्मा की अजिंक्य रहाणे? पहिल्या टेस्टसाठी Playing XI निवडण्याचे विराट कोहली याच्यासमोर मोठं आव्हान)

टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन टेस्ट सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचा पहिला सामना २२ ऑगस्टपासून अँटिगामध्ये खेळला जाईल. टेस्ट मालिकेपूर्वी भारतीय संघाने विंडीजविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली होती. ती टीम इंडियाने 3-0 ने जिंकली. यानंतर तीन सामन्याची वनडे मालिका भारतीय संघाने 2-0 ने जिंकली. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

(Photo Credit: indiancricketteam/Instagram)
(Photo Credit: indiancricketteam/Instagram)
(Photo Credit: indiancricketteam/Instagram)
(Photo Credit: indiancricketteam/Instagram)

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येतील. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 टेस्ट मालिकेत 72 सामने खेळले जातील आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदासाठी सामना होईल. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021 मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला. विजेत्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचा मान मिळेल.