IND vs WI 1st Test Day 3: विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांची शतकी भागीदारी; तिसऱ्या दिवसा खेर टीम इंडियाकडे 260 धावांची आघाडी
कर्णधार विराट कोहली आणि आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली. याचबरोबर तिसऱ्या दिवसअखेर भारताची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे.
भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील पहिल्या टेस्ट सामन्यात तिसऱ्या दिवसा खेर टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत विंडीजला पहिल्या डावात 222 धावांवर रोखले. तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 260 धावांची आघाडी मिळवली. अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 297 धावा केल्या. आणि विंडीजला त्यांच्या पहिल्या डावांत गोलंदाजांनी मुश्किलीत पडले. त्यामुळे भारताकडे 75 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावांत फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. केएल राहुल याने 38, मयंक अग्रवाल 16 आणि चेतेश्वर पुजारा 25 धावा करून बाद झाले. (IND vs WI 1st Test Day 2: जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला, टीम इंडियासाठी 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसरा सर्वात वेगवान गोलंदाज)
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि आणि उपकर्णधार रहाणे यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली. याचबरोबर तिसऱ्या दिवसअखेर भारताची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यावर कोहली आणि रहाणेने दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान दोघांनीही आपली अर्धशतके देखील पूर्ण केली आणि चौथ्या विकेटसाठी अभेद्य 104 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसअखेर कोहली 51 तर रहाणे 53 धावांवर खेळत होते.
विंडीजसाठी दुसऱ्या डावात रोस्टन चेस याने २ गडी बाद केले तर केमर रोच याने 1 गडी बाद केला. तत्पूर्वी, इशांत शर्मा (Ishant Sharma) याने भारतासाठी दमदार गोलंदाजी केली आणि विंडीज संघ त्याचझया चेंडूंसमोर निरुत्तर दिसले. इशांतने 5 विकेट घेतले. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराह याने 1 गडी बाद केला.