IND vs WI 1st Test Day 3: अरुण जेटली यांना 'या' अंदाजात टीम इंडिया वाहणार श्रद्धांजली, जाणून घ्या

यासह आज अँटिगा येथे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू हातावर काळी पट्टी बांधतील.

टीम इंडिया आणि अरुण जेटली (Photo Credits: Getty Images|PTI)

अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्या निधनाबद्दल शनिवारी, 2 ऑगस्ट रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने (BCCI) त्यांना अपवादात्मक राजकारणी आणि 'सक्षम' आणि आदरणीय क्रिकेट प्रशासक म्हटत त्यांचा सन्मान केला. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “जेटली, एक असाधारण राजकारणी आणि एक उत्कट क्रिकेट चाहते होते. त्यांना नेहमी क्रिकेटचे एक सक्षम आणि आदरणीय प्रशासक म्हणून स्मरण केले जाईल. यासह आज अँटिगा येथे भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू हातावर काळी पट्टी बांधतील. (Arun Jaitley Passes Away: अरुण जेटली DDCA अध्यक्ष असताना बनले होते खेळाडूंचे संकटमोचक; वीरेंद्र सेहवाग याने श्रद्धांजली वाहत सांगितली आठवण)

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी खेळण्यासाठी त्यांच्या हातावर काळी पट्टी बांधतील. शुक्रवारी पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसर्‍या दिवशी अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने घातक गोलंदाजी करत विंडीजविरुद्ध 42 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यजमानांनी 59 षटकांत आठ गडी गमावून 189 धावा केल्या. वेस्ट इंडीज सध्या भारताच्या पहिल्या डावातील 297 धावांच्या 108 धावा मागे आहे आणि त्यांचे दोन विकेट शिल्लक आहेत. इशांतने त्याच्या कारकिर्दीतील नवव्या वेळी डावात पाच विकेट्स घेत भारताला मजबूत स्थितीत आणले.

दरम्यान, विशेष म्हणजे अरुण जेटली यांनी 13 वर्षे दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. 1999 ते 2012 पर्यंत जेटली यांनी डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. जेटली यांनी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे कौतुक केले आणि त्यांना जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दिल्ली डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांन गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग सारख्या खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखालीत गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांनी भारतीय संघाच पदार्पण केले होते.