IND vs WI 1st Test Day 1: विराट कोहली, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद, Lunch पर्यंत भारत 3/68
सुरुवातीलाच भारताला तीन मोठे धक्के बसले. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीस्वस्तात माघारी परतले. मयंक 5, पुजारा 2 तर कोहली फक्त 9 धावाच करू शकला. लंचपर्यंत भारताचा स्कोर 3 बाद 68 आहे. विंडीजसाठी केमार रोच याने दोन विकेट्स घेतले तर शेनॉन गैब्रिएल याने 1 विकेट घेतली.
भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील पहिल्या टेस्ट सामन्यातील पहिल्या दिवशी टॉस जिंकून विंडीजने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजी करत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीलाच भारताला तीन मोठे धक्के बसले. मयंक अग्रवाल(Mayank Agrawal), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विंडीज गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकून राहू शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतले. मयंक 5, पुजारा 2 तर कोहली फक्त 9 धावाच करू शकला. यानंतर सलामीला आलेल्या केएल राहुल याने उपकर्णधार अजिंक्य राहणे याच्या साथीने सावध खेळ करत भारताचा डाव सावरला. आणि लंचपर्यंत भारताचा स्कोर 3 बाद 68 धावा आहे. विंडीजसाठी केमार रोच याने दोन विकेट्स घेतले तर शेनॉन गैब्रिएल याने 1 विकेट घेतली. (टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदांसाठी केली 'या' उमेदवारांची निवड; फलंदाजीसाठी विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर)
टी-20 आणि वनडेमध्ये दमदार फॉर्ममध्ये असलेला कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पान पहिल्या डावात कोहली प्रभावित करू शकला नाही. दरम्यान, पहिल्या टेस्टसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), रविचंद्र अश्विन (R Ashwin), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रिद्धिमान सहा (Wriddhiman Saha) यांचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश झाला नाही.
टीम इंडियाने टी-20 आणि वनडे मालिका जरी जिंकली असली तरी विंडीजविरुद्ध टेस्ट मालिका जिंकण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे. विंडीजला टेस्टमध्ये पराभूत करणे भारतीय संघासाठी कठीण असणार आहे.