IND vs WI 1st T20I: टॉस जिंकून भारतीय संघाचा पहिले बॉलिंगचा निर्णय, असा आहे टीम इंडिया आणि विंडीजचा प्लेयिंग इलेव्हन
भारत आणि वेस्ट इंडीज संघातील पहिल्या टी-20 मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे महत्वाच्या मालिकेत न खेळू शकलेला भुवनेश्वर कुमार यानेदेखील टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे.
भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) संघातील तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांमधील पहिला सामना थोड्याच वेळात सुरु होईल. पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन याला पुन्हा संधी मिळाली नाही. टी-20 विश्वचषकच्या हिशोबाने विंडीज मालिका सलामी फलंदाज केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यासाठी महत्वही मानली जात आहे. टी-20 क्रिकेटमध्ये राहुलने चांगला खेळ केला आहे. शिखर धवन याला दुखापत झाल्याने त्याला यंदा डावाची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. राहुलऐवजी रिषभ पंत हादेखी समीक्षकांना चुकीचा सिद्ध करू इच्छित असेल. शिवाय, दुखापतीमुळे महत्वाच्या मालिकेत न खेळू शकलेला भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आहे. (IND vs WI 1st T20I: युजवेंद्र चहल याने नेट्समध्ये फलंदाजी करतानाचा फोटो केला पोस्ट, इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू डेनिएल वैट ने केली मजेशीर कमेंट)
ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्या मैदानात भारतीय संघाने 3-0 ने पराभूत केले होते. त्यामुळे, त्याचा बदला यंदा विंडीज संघ भारतात मालिका जिंकून घेऊ इच्छित असेल. टी-20 मध्ये विंडीजची गणना चांगल्या संघात केली जाते, पण काही सामान्यांपासून विंडीज संघ संघर्ष करताना दिसत आहे. त्यांनी लखनौमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला होता. कॅप्टन किरोन पोलार्ड पुढाकार घेत नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात असेल. हैदराबादमधील पहिल्या मॅचसाठी असा आहे टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजचा प्लेयिंग इलेव्हन:
टीम इंडियाचा प्लेयिंग इलेव्हन: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, श्रेयस अय्यर (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल.
वेस्ट इंडिज प्लेयिंग इलेव्हन: लेंडल सिमंस, एव्हिन लुईस, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमेयर, किरोन पोलार्ड (कॅप्टन), दिनेश रामदिन (विकेटकीपर), जेसन होल्डर, हेडन वाल्श जूनियर, शेल्डन कोटरेल, केसरीक विल्यम्स, खेरी पियरे
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)