Ind vs WI 1st T20I 2019: पहिल्या टी -20 सामन्यात भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर 4 गडी राखून दणदणीत विजय

वेस्ट इंडिज (West Indies) पहिल्या ट्वेन्टी-20 (T-20) सामन्यात, भारताने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत 4 गडी राखून विजय मिळवला आहे. यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतासाठी योग्य ठरला.

India National Cricket Team (Photo Credits: Getty Images)

India vs West Indies 1st T20I 2019: भारत (India) वि. वेस्ट इंडिज (West Indies) पहिल्या ट्वेन्टी-20 (T-20) सामन्यात, भारताने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत 4 गडी राखून विजय मिळवला आहे. सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिअमवर हा सामना पार पडला. यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतासाठी योग्य ठरला. भारताच्या उत्तम गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिज संघ जास्त धावा करू शकला नाही. इंडिजकडून फक्त कायरन पोलार्डच चांगली कामगिरी करू शकला. एव्हिन लुइस, निकोलस पूरन, शॅमरॉन हेटमेयर, रोव्हमन पॉवेल असे सुरुवातीचे सर्व फलंदाज 0 ते 20 धावा करून बाद झाले. वेस्ट इंडिजसाठी हा फार मोठा धक्का होता. अखेर इंडिजकडून भारताला अवघ्या 96 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.

भारताकडून ऋषभ पंत वगळता सर्व खेळाडूंची कामगिरी समाधानकारक होती. 14 षटकांनंतर भारताचे 5 गडी बाद 69 धावा होत्या. त्यानंतर भारताने मुसंडी मारत शेवटच्या काही मिनिटांत कमाल दाखवत, चार गडी राखत विजय मिळवला. दरम्यान विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेश राहुलला, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे सामन्यावर परिणाम होईल अशी शंका व्यक्त केली गेली होती मात्र तसे काही घडले नाही. (हेही वाचा: नक्कीच, एक दिवस 'टीम इंडिया'चा कोच व्हायला आवडेल- सौरव गांगुली)

भारतीय संघासाठी शिखर धवनने 01, रोहित शर्माने 24, कर्णधार विराट कोहलीने 19, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 0, मनीष पांडे 19, क्रुणाल पांड्या 12, वॉशिंग्टन सुंदर नाबादने 08 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 10 धावा केल्या. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.