IND vs WI 1st ODI: चेन्नई वनडेमध्ये शिमरोन हेटमायर-शाई होप ची तुफान बॅटिंग; वेस्ट इंडिजचा भारतावर 8 विकेटने विजय

भारतीय संघाने दिलेल्या 288 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने विकेटने 8 विजय मिळवला. शिमरोन हेलमेयर आणि शाई होप यांनी विंडीजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.हेलमेयरने सर्वाधिक धावा केल्या. हेलमेयरने 139 धावांची महत्वाची खेळी केली. होपने नाबाद 102 धावांचे योदान देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला.

File image of India vs Windies cricket match. (Photo Credits: Getty Images)

चेन्नई वनडे सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) दिलेल्या 288 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने विकेटने 8 विजय मिळवला. भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) आणि शाई होप (Shai Hope) यांनी विंडीजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. हेलमेयरने सर्वाधिक धावा केल्या. हेलमेयरने शतकी खेळीत 106 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 7 षटकार मारत 139 धावांची महत्वाची खेळी केली. होपने नाबाद 102 धावांचे योदान देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. विंडीजकडून होपसह निकोलस पूरन (Nicholas Pooran) 25 धावांवर नाबाद राहिला. हेटमेयर आणि होपमध्ये 218 धावांची भागीदारी झाली. हेटमेयरने 85 चेंडूत शतक पूर्ण केले. हेटमेयरचे चेन्नई वनडे मॅचमधील त्याचे पाचवे तर भारताविरुद्ध दुसरे शतक होते. या पराभवासह भारताची खराब गोलंदाजी आणि फिल्डिंग पुन्हा एकदा समोर आली. दरम्यान, भारताकडून दीपक चाहर (Deepak Chahar) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनांच विकेट घेण्यात यश आले. चाहर आणि शमीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी सर्वाधिक धावा केल्या. पहिले फलंदाजी करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. केएल राहुल आणि विराट कोहली यांसारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हिलिअनमध्ये परतले. (IND vs WI 1st ODI: रवींद्र जडेजा याच्या रन-आऊटवर झाला विवाद; अंपायरवर भडकले विराट कोहली आणि किरोन पोलार्ड, पाहा Run-Out चा हा व्हिडिओ)

एम. ए चिदंबरममधील सामन्यात टॉस जिंकून किरोन पोलार्ड याने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब होती पण पंत आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. केदार जाधव यानेही 40 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कोटरल, किमो पॉल आणि अलझारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडियाने दिलेल्या 288 धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला दीपकने पहिला धक्का दिला. चाहरने सुनील अंब्रीस (Sunil Ambris) याला 9 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. पण यानंतर भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. हेटमायर आणि होपने सावध खेळी केली आणि संघाला अजून कोणताही धक्का लागू दिला नाही. दोंघांनी चांगली भागीदारी करत संघाच्या विजय निश्चित केला. 11 धावांवर पहिली विकेट गमावलेल्या विंडीजने 229 धावांवर दुसरी विकेट गमावली. पण, तोवर भारतासाठी खूप उशीर झाला होता.

भारताकडून पंत आणि श्रेयसने सर्वाधिक अनुक्रमे 71 आणि 70 धावा केल्या. या विजयासह विंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.  दोन्ही संघातील दुसरा वनडे सामना आंध्रप्रदेशच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये 18 डिसेंबरला खेळला जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now