IND vs SL: श्रीलंकन खेळाडूंच्या बसमध्ये सापडल्या बंदुकीच्या गोळयांच्या पुंगळ्या

आयटी पार्क जवळील हॉटेलमधून ही बस या घेळाडूंना घेऊन पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) स्टेडियममध्ये घेऊन जात होती.

Cricket | Representational Image (Photo Credits: Pixabay)

चंडीगढ (Chandigarh) पोलिसांना श्रीलंकन क्रिकेटपटूंना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या (Empty Bullets) पुंगळ्या सापडल्या आहेत. आयटी पार्क जवळील हॉटेलमधून ही बस या घेळाडूंना घेऊन पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) स्टेडियममध्ये घेऊन जात होती. प्राप्त माहितीनुसार चंडीगड येथील सेक्टर-17 येथील तारा ब्रदर्स या खासगी वाहतुकदाराकडून ही बस भाडेतत्वावर घेण्यात आली होती.

श्रीलंकन खेळाडून स्टेडीयमकडे जाताना बसमध्ये चढत होते. तत्पूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने बसची तपासणी करण्यात आली या वेळी या पुंगळ्या सापडल्या. आयटी पार्कजवळील हॉटेल ललीत येथून हे खेळाडू बसमध्ये चढत असताना हा प्रकार समोर आला.खेळाडू कोणत्याही देशाचे असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवांची नियमीत तपासणी केली जाते. त्यामुळे याही वेळी खेळाडूंना सेवा देणाऱ्या बसची मेटल डिटेक्टर आणि इतर अत्याधुनिक साधनांद्वारे बसची नियमीत तपासणी करण्यात आली. या वेळी बंदुकीच्या गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, क्रिकेटपटूंना घेऊन जाण्यापूर्वी ही बस एका विवाहाच्या कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात आली होती. त्यामुळे त्या वेळी काही अनुचीत प्रकार घडला होता का? याबाबत आता पोलीस तपास करत आहे. बसचालकाकडे चौकशी सुरु असल्याचे समजते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif