IND vs SL 1st Test: विराट कोहली याच्या 100 व्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा म्हणाला, ‘मला 40 कसोटी खेळल्याचा आनंद...’; जाणून घ्या असा की म्हणाला ‘हिटमॅन’
मोहाली कसोटीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला की, तो फक्त 40 कसोटी सामने खेळला आहे आणि आता तो कर्णधार आहे, मग त्याने स्वत:साठी कोणते लक्ष्य ठेवले आहे? यावर रोहितने आपण 40 कसोटी सामने खेळूनही आनंदी असल्याचे सांगितले.
IND vs SL 1st Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर पहिला कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना केवळ विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठीच नव्हे तर रोहित शर्मा (Rohit Sharma) साठी देखील खास आहे. एकीकडे विराट कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळत आहे, तर रोहित प्रथमच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. मोहाली कसोटीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला की, तो फक्त 40 कसोटी सामने खेळला आहे आणि आता तो कर्णधार आहे, मग त्याने स्वत:साठी कोणते लक्ष्य ठेवले आहे? यावर रोहित शर्माने मजेशीर उत्तर देत आपण 40 कसोटी सामने खेळूनही आनंदी असल्याचे सांगितले. तसेच विराट कोहलीचे कौतुक करताना रोहित शर्माने असेही म्हटले की टीम इंडियाच्या यशाचे श्रेय विराट कोहलीलाच जाते. (Virat Kohli 100th Test: विराट कोहलीचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विशेष कॅप देऊन केला सन्मान, पत्नी Anushka Sharma साथीला उपस्थित)
रोहित शर्मा डिजिटल पत्रकार परिषदेत म्हणाला, “मी स्वत:साठी कोणते ध्येय ठेवले पाहिजे? मी आता संघाचा विचार करत आहे. 40 कसोटी सामने खेळूनही मी आनंदी आहे. मला अनेक दुखापती झाल्या आहेत, चढ-उतार आले आहेत. मला हे करावे आहे. मला ते करावे आहे असे मला वाटत नाही. मी फक्त कर्णधार म्हणून विचार करत आहे. मला फक्त संघासाठी चांगले करायचे आहे.” तसेच रोहितने कसोटी क्रिकेटमधील आपली रणनीती अतिशय सोपी असल्याचे सांगितले. रोहित म्हणाला की, त्याला माहित आहे की कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद पूर्णपणे वेगळे आव्हान असते. रोहित म्हणाला, “टेस्ट क्रिकेट वनडे आणि टी-20 क्रिकेटपेक्षा वेगळे आहे. पण कर्णधार म्हणून माझी विचारसरणी सारखीच आहे. परीक्षेतही परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. कसोटीत दररोज गोष्टी बदलतील, त्यानुसार रणनीती बनवावी लागेल.”
रोहित पुढे म्हणाला, “मी पुढे फारसा विचार करत नाही. आव्हान म्हणजे मी प्रथमच कसोटीत नेतृत्व करत आहे. मी रणजी ट्रॉफीमध्ये नक्कीच कर्णधारपद भूषवले आहे पण ते वेगळे आव्हान आहे आणि मी तयार आहे.” दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध संघाची हाती घेऊन मैदानात उतरलेला रोहित भारतीय कसोटी संघाचा 35 वा कर्णधार बनला. यापूर्वी, गेल्या महिन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करून केएल राहुल 34 वा कर्णधार बनला होता.