IND vs SA Test 2019: रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेत तीन पराक्रम केले जे सचिन तेंडुलकर करू शकला नाही, जाणून घ्या
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांची टेस्ट टेस्ट मालिकेत रोहितने अशी कामगिरी केली जी क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यालाही करण्यासाठी जमले नाही. कसोटी क्रिकेटमधील रोहितच्या 'या' तीन कामगिरी ज्यांना सचिनही साध्य करू शकला नाही.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील 3 सामन्यांची टेस्ट मालिका संपुष्टात आली आहे. नुकत्याच संपुष्टात आलेल्या मालिकेत भारताने 3-0 असा क्लीन-स्वीप केला आणि पहिल्यांदा आफ्रिकेवर क्लीन-स्वीप मिळवला. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी बजावली आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पहिल्या डावात भारतीय संघाने 9 बाद 497 अशी मजबूत धावसंख्या उभारली. त्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 132 आणि दुसऱ्या डावात फक्त 133 धावा केल्या. यात टेस्ट संघात पहिल्यांदा सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याने उल्लेखनीय कामगिरी केली. टेस्ट संघात 5 व्या, 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या रोहितला पहिल्यांदा टेस्टमध्ये भारतासाठी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. आणि ती त्याने हातून जाऊ दिली नाही आणि शानदार प्रदर्शन केले. मागील 2 वर्षांपासून आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील भारतीय संघ सलामी जोडीबाबत संघर्ष करीत होता. पण, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रोहितची कामगिरी पाहता त्याने संघाची ही समस्या दूर केली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. (IND vs SA 3rd Test: शाहबाझ नदीम याने घेतली लुंगी एनगीडी याची विचित्र विकेट, पाहून सर्व झाले आश्चर्यचकित, पहा Video)
नुकत्याच संपुष्टात आलेली आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेत रोहितने अशी कामगिरी केली जी क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही करण्यासाठी जमले नाही. कसोटी क्रिकेटमधील रोहितच्या 'या' तीन कामगिरी ज्यांना सचिनही साध्य करू शकला नाही.
एका टेस्ट मालिकेत 3 शतक
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहितने 176, 127 आणि 212 धावा केल्या आहेत. पहिल्यांदा टेस्टमध्ये सलामीला फलंदाजी करणाऱ्या रोहितने शानदार फलंदाजी केली आणि आफ्रिकी गाळणदाजांची शाळाच घेतली. या मालिकेत रोहितने 132.25 च्या सरासरीने धावा केल्या. विशेष म्हणजे, महान सचिन तेंडुलकर एका कसोटी मालिकेतकधीही तीन शतकं करू शकला नाही. मास्टर ब्लास्टरने 11 वेळा एका मालिकेत दोन शतकं केली आहे.
एका टेस्टच्या दोन डावात शतक
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रोहितने शानदार शतकं ठोकली. त्याने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 127 धावांची खेळी केली होती. सलामी फलंदाज म्हणून एका सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा रोहित पहिला क्रिकेटपटू ठरला. दुसरीकडे, सचिनने 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत भारतासाठी 200 कसोटी सामने खेळले, पण कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये तो कधीही शतक करू शकला नाही.
एका टेस्ट मालिकेत 500 धावा
24 वर्षांच्या दीर्घ आणि अत्यंत यशस्वी कारकिर्दीत सचिन एकदाही एका टेस्ट मालिकेत 500 धावा करू शकला नाही. 2007-08 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यावर दौऱ्यादरम्यान त्याने 70.43 च्या सरासरीने 493 सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर, दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सध्याच्या कसोटी मालिकेत रोहितने 132.35 च्या सरासरीने 4 डावांमध्ये 529 धावा केल्या आहेत. यात एक दुहेरी शतक आणि दोन शतकांचा समावेश आहे.
रोहितने 2013 मध्ये मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून सुरुवात केली होती. उल्लेखनीय म्हणजे रोहितने सचिनच्या वेस्ट इंडिजविरुद्ध 2013 मधील अंतिम आंतरराष्ट्रीय टेस्ट सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात शिखर धवन यांच्यानंतर रोहितने दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. रोहितने 177 धावा केल्या होत्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)