Jasprit Bumrah-Marco Jansen Altercation: मैदानावर जसप्रीत बुमराह सोबत झाली तू-तू मैं-मैं, आता दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाने असा केला बचाव
दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबतच्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे. जोहान्सबर्ग येथे दुसऱ्या कसोटीत दोघांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान पंचांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर तिसऱ्या कसोटीदरम्यान जॅन्सेनला बाद केल्यावर बुमराहची प्रतिक्रियाही जोरदार व्हायरल झाली होती.
Marco Jansen on altercation with Jasprit Bumrah: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनने (Marco Jansen) भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सोबतच्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज जॅन्सेन कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर भरपूर उसळी आणि वेग मिळवला व बहुतेक प्रसंगी भारताच्या अनुभवी फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. जॅन्सेनने तीन कसोटीत 16.47 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या आणि मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या गोलंदाज ठरला. जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत जॅन्सेनने जसप्रीत बुमराहला शॉर्ट बॉल्सने खूप त्रास दिला. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2021 च्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) ड्रेसिंग रूम शेअर केले, परंतु जोहान्सबर्गमध्ये दोघेही एकमेकांविरुद्ध आक्रमक दिसले. (IND vs SA 2nd Test Day 3: जसप्रीत बुमराह-Marco Jansen यांच्यात झाला राडा, वांडरर्सवर भारत-दक्षिण आफ्रिका खेळाडू भिडले, असे शांत झाले प्रकरण Watch Video)
जोहान्सबर्ग येथे दुसऱ्या कसोटीत दोघांमध्ये झालेल्या वादावादीदरम्यान पंचांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर तिसऱ्या कसोटीदरम्यान जॅन्सेनला बाद केल्यावर बुमराहची प्रतिक्रियाही जोरदार व्हायरल झाली होती. आता या संपूर्ण वादावर जॅन्सेनने मौन सोडले आहे. जॅन्सेनने सांगितले की, “पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात तो खूप घाबरला होता, कारण त्याने हाफ-व्हॉली बॉल टाकून अनेक चौकार दिले होते. दुसऱ्या डावात त्याने चांगले पुनरागमन केले, जिथे त्याने चार विकेट्स घेतल्या. तो म्हणाला की त्याला क्रीजवर असताना स्वतःला अधिक व्यक्त आणि खेळावरील आपले प्रेम प्रकट करायचे आहे. जॅन्सेन म्हणाला की देशासाठी खेळण्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा आयपीएल सहकारी बुमराह असला तरीही त्याला मागे राहणे आवडत नाही. तो म्हणाला की “तुन तुझ्या देशासाठी खेळतोस, तू कशासाठीही मागे हटणार नाहीस आणि अर्थातच तो (जसप्रीत बुमराह) तसाच खेळतो.”
जॅन्सेन म्हणाला, “पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात मला हवी तशी सुरुवात मिळाली नाही आणि मी खूप घाबरलो होतो. प्रत्येक खेळाडूला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मैदानाबाहेर, मी एक शांत माणूस आहे, मी अंतर्मुख आहे पण जेव्हा मी मैदानावर असतो तेव्हा मला व्यक्त व्हायला आवडते. मला हा खेळ खूप आवडतो, मला लहानपणापासून खेळायची इच्छा होती. माझ्या खेळाबद्दल किती प्रेम आणि उत्कटता आहे हे सर्व भावना दर्शवतात. अर्थात, मी जसप्रीत बुमराहसोबत आयपीएलमध्ये खेळलो, आम्ही चांगले मित्र आहोत पण कधी कधी मैदानावर गोष्टी गरम होतात.”
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)