IND Vs SA ODI Series 2020: विराट कोहली, रोहित शर्मा संघाबाहेर? आता 'हा' खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व
भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येत्या 12 मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात (IND vs SA ODI Series 2020) चांगले प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
न्यूझीलंड दौऱ्या दरम्यान भारतीय संघाला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येत्या 12 मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात (IND vs SA ODI Series 2020) चांगले प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. तसेच उपकर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. यामुळे दक्षिण अफ्रिका विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माला वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडू सोपवण्यात येणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तडाखेबाज फलंदाज के.एल. राहुल (K.L.Rahul) याच्याकडे देण्यात येणार, अशी शक्यता आहे. तसेच यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
न्यूझीलंड दौऱ्या दरम्यान भारताचा सलामीवीर रोहीत शर्माला 5 टी-20 मालिकेच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर भारताचा युवा खेळाडू के.एल .राहुल याने रोहित शर्माची जागा घेतली होती. सध्या के.एल राहुल चांगल्या फार्ममध्ये असल्याचे दिसत आहे. के.एल राहुलने 32 एकदिवसीय सामने खेळून 31 डावात 1 हजार 239 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 42 सामन्यातील 38 डावात 1 हजार 461 धावा केल्या आहेत. तर, कसोटी सामन्यात के.एल राहुलने 36 सामने खेळले असून त्यापैंकी 60 डावात 2 हजार 6 धावा केल्या आहेत. भारतीय दौऱ्यावर येणाऱ्या दक्षिण अफ्रिकेच्या संघ घोषीत करण्यात आला आहे. दक्षिण अफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व क्विंटन डी कॉक करणार आहे. तसेच भारताविरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत फाफ डु प्लेसिस आणि रासी वॅन डर हुसेन यांनाही संधी मिळाली आहे. हे देखील वाचा- ICC Women’s T20 World Cup 2020: भारतीय महिला क्रिकेट संघाचा फायनलमध्ये प्रवेश; विराट कोहली, के.एल राहुल, शिखर धवन यांच्यासह 'या' माजी खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव
दक्षिण अफ्रिकाचा संघ:
क्विंटन डीकॉक (कर्णधार), तेंबा बावुमा, फाफ डुप्लेसिस, रासी वैन डर डुसेन, काइल वेरेयने, हेनरिच क्लासन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, ऍन्डिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरेन हेन्ड्रिक्स, एनरिच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.
बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केली नाही. परंतु, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर के.एल राहुल कर्णधार पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.