IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final Live Streaming Online: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार जगज्जेतेपदासाठी महामुकाबला, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ आमनेसामने असतील. 2007 मध्ये भारत टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला होता, पण त्यानंतर ही टीम 17 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची वाट पाहत आहे.
IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलचा दिवस आज अखेर येऊन ठेपला आहे, ज्याची चाहत्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ अंतिम सामन्यात आमनेसामने असतील. भारताने अंतिम फेरी गाठल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा सामना बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार असुन जगज्जेते होण्याच्या शर्यतीत एकाला शरणागती पत्करावी लागणार आहे. एकीकडे आफ्रिका आपला पहिला विश्वचषक फायनल खेळणार आहे, तर दुसरीकडे भारत 10 वर्षांनंतर टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2007 मध्ये भारत टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला होता, पण त्यानंतर ही टीम 17 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची वाट पाहत आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू हा अंतिम सामना भारतात तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?
अंतिम सामना कधी आणि कुठे पाहणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता हा सामना सुरू होईल. भारतात पाहणारे लोक रात्री 8 वाजल्यापासून अंतिम सामना थेट पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्ही दर्शक थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. मोबाइलवर डिस्ने+ हॉटस्टारवरही मॅचचा लाईव्ह स्ट्रीम उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: IND vs SA Final Rules: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आयसीसी फायनलचे हे आहेत नवीन नियम, कोणत्या संघाला होणार फायदा? घ्या जाणून)
उपांत्य फेरीच्या सामन्यांचे निकाल
पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी झाला होता, जो पहिल्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळत होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ अवघ्या 56 धावांत सर्वबाद झाला. आफ्रिकन संघाने हे लक्ष्य 9 विकेट्स राखून पूर्ण केले आणि फायनलमध्ये सहज प्रवेश केला. दुसरीकडे, 2022 च्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला घेत भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, जॉर्न फॉर्च्यून, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स