IND vs SA 3rd Test: सलग 9 टॉस हरणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने काढला तोडगा, नाणेफेकसाठी येणार आता नवीन खेळाडू

मालिका आधीच गमावल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने मागील मॅचसह आशियामध्ये सलग 9 वेळा टॉस गमावला आहे. म्हणून जेएससीए आंतरराष्ट्रीय कॉम्प्लेक्स स्टेडियमवर सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टच्या टॉससाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार दुसर्‍या खेळाडूला पाठवणार आहे.

(Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात उद्यापासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत अंतिम सामना रांची (Ranchi) च्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळला जाईल. भारताविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका आधीच गमावल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) तिसरा सामना जिंकत दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असेल. आणि असे करण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीतील सुधारणांव्यतिरिक्त डू प्लेसिसला थोड्याफार भाग्याची गरज आहे. डू प्लेसिसने मागील मॅचसह आशियामध्ये सलग 9 वेळा टॉस गमावला आहे. आणि म्हणून जेएससीए आंतरराष्ट्रीय कॉम्प्लेक्स स्टेडियमवर सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टच्या टॉससाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार दुसर्‍या खेळाडूला पाठवणार आहे. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, डु प्लेसिसने याबद्दल गुरुवारी पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. (IND vs SA 3rd Test: कर्णधार विराट कोहली याच्या निशाण्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड, जाणून घ्या कोणाला टाकू शकतो पिछाडीवर)

विशेष म्हणजे,डू प्लेसिसने कर्णधार म्हणून सुरुवात केली तेव्हा त्याने सलग 7 टॉस जिंकले होते. पत्रकार परिषदेदरम्यान डु प्लेसिसने आपल्या फलंदाजांना पहिल्या डावात सर्वाधिक कामगिरी कशी करावी लागेल यावर भर दिला होता. टॉसबद्दल बोलले तर, डु प्लेसिस टेंबा बावुमा (Temba Bavuma) याला टॉसला पाठवू शकतो.बावुमा, हा आफ्रिकी संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे बावुमाची टॉससाठी जाण्याची शक्यता जास्त आहे.

दुसरीकडे, तिसऱ्या मॅचबद्दल बोलले तर, शनिवारी सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यात टॉस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. पहिले प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल. मोठी धावसंख्या केल्यावर चौथ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मोठे कठीण होऊ शकते. या मॅचपूर्वी आफ्रिकी संघाला दोन मोठे धक्के बसले आहे. सलामी फलंदाज एडन मार्क्रम आणि फिरकीपटू केशव महाराज यांनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे.