IND vs SA 2nd Test: मॅचदरम्यान रोहित शर्मा याच्या चाहत्याने सुरक्षा भंग केल्याबद्दल सुनील गावस्कर संतापले, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केले 'हे' मोठे विधान
गावस्कर कॉमेंट्री समितीचा एक भाग होते. गावस्कर या घटनेमुळे खूप नाराज आहेत आणि त्यांनी मैदानातील सुरक्षा कर्मचार्यांच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शनिवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टदरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या एका चाहत्याने सुरक्षा भंग करत मैदानात प्रवेश केल्याने माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) खूप रागावले आहे. गावस्कर कॉमेंट्री समितीचा एक भाग होते. सामन्याच्या तिसर्या दिवशी स्लिपवर क्षेत्ररक्षण करणार्या रोहितच्या जवळ एका चाहत्याने स्टेडियमच्या सुरक्षेचा भंग केला आणि रोहितच्या जवळ जाऊन पोहचला. त्याने रोहितच्या पायाला स्पर्श केला त्यानंतर सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला जबरदस्ती मैदानाबाहेर काढले. गावस्कर या घटनेमुळे खूप नाराज आहेत आणि त्यांनी मैदानातील सुरक्षा कर्मचार्यांच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रसंगाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेनुरन मुथुसामीला बाद झाल्यानंतर वर्नोन फिलेंडर मैदानात उतरलेल्या वेळेची ही घटना आहे. (IND vs SA 2nd Test 2019: दुसऱ्या टेस्ट दरम्यान रोहित शर्मा याच्या चाहत्याने केले असे काम की अजिंक्य रहाणे यालाही झाले हसू अनावर, पहा Photo)
गावस्कर म्हणाले, "अशा घटना घडतात कारण सुरक्षा कर्मचारी प्रेक्षकांवर लक्ष्य देत नाही आणि मॅच पाहतात. भारतामध्ये ही नेहमीची समस्या आहे. हा सामना विनामूल्य पाहण्यासाठी सुरक्षा कर्मचारी येथे नाहीत. ते अशा घटना रोखण्यासाठी आहेत." सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटना अत्यंत धोकादायक असल्याचे गावस्कर म्हणाले. ते म्हणाले, "मी म्हणतो की सुरक्षा मंडळाकडे कॅमेरा ठेवा आणि ते सामना पाहत आहेत की प्रेक्षक."
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात चाहत्याने मॅचदरम्यान प्रवेश केला असतानाची ही तिसरी घटना आहे. विशाखापट्टणममधील पहिल्या कसोटी सामन्यात एका चाहत्याने मैदानात घुसून भारतीय कर्णधार विराट कोहली याच्याशी हातमिळवणी केली आणि सेल्फी काढण्याचादेखील प्रयत्न केला. यापूर्वी मोहालीतील दोन्ही संघांमधील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान चाहत्याने मैदानात प्रवेश केल्यामुळे दोनदा मॅच काही काळ थांबण्यात अली होती.