IND vs SA 2nd Test: ‘राहुल द्रविडने नक्कीच बांबू लावला असेल’, दक्षिण आफ्रिकेला विकेट भेट दिलेल्या स्टार भारतीय खेळाडूला सुनील गावस्करने सुनावले

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाला रिषभ पंतकडून खूप आशा होत्या. पण ज्याप्रकारे त्याने विकेट गमावली त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आणि त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांना वाटते की पंतला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ‘बांबू’ लावला असेल. दुसऱ्या डावात कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो तीन चेंडूत शून्यावर माघारी परतला.

माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test: भारतीय संघाचा (Indian Team) स्टार विकेटकीपर रिषभ पंतची (Rishabh Pant) सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. चाहतेच नाही तर खेळाचे जाणकार देखील सध्या पंतची चर्चा करत आहेत. पंत सध्या टीकाकारांच्या नजरेत भरला आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाला (Team India) पंतकडून खूप आशा होत्या. पण ज्याप्रकारे त्याने विकेट गमावली त्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आणि त्यामुळेच त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पुन्हा एकदा पंतवर टीका करत हा खेळण्याचा मार्ग नसल्याचे म्हटले आहे. भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज गावसकर यांना वाटते की पंतला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) ‘बांबू’ लावला असेल.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या डावात कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात तो तीन चेंडूत शून्यावर माघारी परतला. (IND vs SA 2nd Test: ‘जबरदस्त कर्णधार आहे...’ डीन एल्गर-Rassie van der Dussen ने घेतला पंतशी पंगा, भारतीय विकेटकीपरने दिले जशास तसे उत्तर; पहा Video)

विशेष म्हणजे पंतपूर्वी भारताने नुकतेच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा, या सेट फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या होत्या, ज्यामुळे फलंदाजाच्या शॉट निवडीबद्दल तीव्र आक्षेप घेतला गेला. दरम्यान, गावस्कर यांनी पंतने अशा शॉट्सचा प्रयत्न केल्याची उदाहरणे दिली, पण त्या सर्व घटनांवर, जोहान्सबर्गमधील उदाहरणाप्रमाणे काही साहसी प्रयत्न करण्याआधी त्याने केला नाही असे म्हटले. “हा एक वैध प्रश्न आहे. ऋषभ पंत 30 आणि 40 धावांवर फलंदाजी करत असेल तर हे समजू शकत होते. ही गोष्ट त्याने ऑस्ट्रेलियात केली नव्हती. तिथे त्याने स्वतःला लागू केले, सुरुवातीला कठीण प्रसंग येतील हे ओळखले की तुम्ही फलंदाजीला याल आणि नंतर कठीण प्रसंगातून झुंज देत तो सेट झाला व खेळपट्टी कशी आहे हे त्याला कळले. आणि मग त्याने मोठे फटके खेळले. त्याने ऑस्ट्रेलियात हेच केले,” गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले.

“हे आम्ही इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या सुरुवातीला पाहिले. जेव्हा इंग्लंड भारतात आला तेव्हा तो खेळपट्टीवरून पुढे जाऊन जेम्स अँडरसनला फटकावण्याचा प्रयत्न करत होता… त्याने ते खूप चांगले केले. पण त्यानंतर, तो खेळण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्याला वाटते. तो खेळण्याचा मार्ग नाही आणि मला खात्री आहे की चेंज रूममध्ये राहुल द्रविडने त्याला ऐकवले असेल किंवा क्रिकेटमध्ये म्हणतात तसे द्रविडने त्याला ‘बांबू’ दिला असावा,” गावस्कर पुढे म्हणाले. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाऊस आणि ओलसर मैदानामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेवर सुरू झाला नाही. जोहान्सबर्गमध्ये आज आणि उद्या दोन्ही दिवशी पावसाचा अंदाज आहे. टीम इंडियाला विजयासाठी आठ विकेट्सची गरज आहे तर दक्षिण आफ्रिका विजयापासून आणखी 122 धावा दूर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now