IND vs SA 2nd Test Day 4: रिद्धिमान साहा याने झेलला Superman कॅच; चाहत्यांसह विराट कोहली देखील झाला अचंबित, पहा (Video)
साहाने पकडलेला हा कॅचपाहून स्वतः कर्णधार विराट कोहली देखील अचंभित राहिला.
भारताचा कसोटी विकेटकीपर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने दक्षिण आफ्रिकेच्या थेयूनिस डी ब्रुईन (Theunis de Bruyn) याला बाद करण्यासाठी अचंबित करणारा कॅच पकडला. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत रिषभ पंत याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाही. पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शानदार फलंदाजी केली होती, परंतु असे असूनही साहाला दक्षिण आफ्रिकाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली. आणि याचे मुख्य कारण साहाच्या विकेटकीपिंगला मानले जात आहे. तसे यंदा त्याने ते सिद्धही करून दाखवले. शनिवारी त्याने डी ब्रुईनला माघारी धाडण्यासाठी उमेश यादव याच्या चेंडूवर अप्रतिम झेल घेतला तर आज त्याच कॅचची पुनरावृत्ती करत साहाने पुन्हा डी ब्रुईनचा झेल पकडला. (IND vs SA 2nd Test Day 3: विराट कोहली, रिद्धिमान साहा यांनी मैदानात दाखवली जबरदार स्फूर्ती; झेलले अप्रतिम कॅच, पहा Video)
सहाव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर उमेशने टाकलेला चेंडूडी ब्रुईनच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून विकेटकीपरकडे गेला आणि साहाने त्याच्या डाव्याबाजूला लांब उडी मारली आणि मुश्किल झेल पकडला. साहाने पकडलेला हा कॅचपाहून स्वतः कर्णधार विराट कोहली देखील अचंभित राहिला. डी ब्रुईन आठच धावा करू शकला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला अजूनही मोठा पराभव पुढे ढकलण्यासाठी वेळ आहे, परंतु त्याआधी मजबूत भागीदारीची आवश्यकता आहे. साहाच्या या कॅचचा सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. काहींनी तर पाकिस्तनी कर्णधार सरफराज अहमद याच्या विकेटकिपिंग कौशल्याशी त्याची तुलना केली. पहा हा व्हिडिओ:
सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रतिक्रिया:
रिद्धिमान साहाची विकेटकिपिंग पाहून पाकिस्तानी चाहते
विकेटच्या मागे सर्वात सुरक्षित हात
साहा सध्या जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर
त्याने तो किती सहज कॅच पकडला
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना पुण्यात सुरू आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस असून भारताने फॉलोऑन दिल्याने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा फलंदाजीला उतरावे लागले आहे. टीम इंडियाकडे सध्या 326 धावांची आघाडी आहे. फॉलोऑन नंतरच्या डावात खेळत दक्षिण अफ्रिकेने 2 गडी गमावले आहेत.