IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेत Rishabh Pant याचे फ्लॉप सत्र सुरूच, तिसऱ्या कसोटीतून ‘हे’ दोन करू शकतात सुट्टी
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्यामुळे आता केपटाउन येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान डोक्यात आल्याचे दिसत आहेत. अशा परिस्थितीत दोन खेळाडू त्याची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत.
IND vs SA Test 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाच्या (Team India) खराब फलंदाजीचे सत्र यंदाही सुरूच राहिले. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळता अन्य फलंदाज मोठी करू शकले नाही. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. पहिल्या डावात 17 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात तो खातेही उघडू शकला नाही. दुसऱ्या डावात त्याने कगिसो रबाडाच्या चेंडूवर सहज झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. याशिवाय सेंच्युरियन कसोटी सामन्यात देखील संघ अडचणीत असताना फलंदाजीने योगदान देऊ शकला नाही. त्यामुळे आता केपटाउन (Cape Town) येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान डोक्यात आल्याचे दिसत आहेत. (IND vs SA 2nd Test Day 3: कगिसो रबाडाचा भारताला तिसरा दणका, Rishabh Pant शून्यावर माघारी)
पंत टीम इंडियाची कमकुवत कडी ठरत आहे. त्याची सातत्यपूर्ण खराब कामगिरी आता संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पंतने आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळलेली नाही, त्यामुळे आता संघातील त्याचे स्थान विचार करण्याच विषय बनला आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज पंतला तिसऱ्या सामन्यातून वगळण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते. अशा परिस्थितीत दोन खेळाडू त्याची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत.
1. केएस भरत
केएल राहुलने कसोटी संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी घेतल्यास पंतच्या जागी आणखी एका अष्टपैलू खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. असे केल्याने संघाला अतिरिक्त फलंदाजासह गोलंदाज मिळेल. आणि यासाठी आंध्र प्रदेशचा युवा खेळाडू केएस भरतचे नाव आघाडीवर आहे. भरतने देशांतर्गत सामन्यांमध्ये त्रिशतक झळकावले असून त्याची विकेटकीपिंग पद्धत पंतपेक्षा चांगली आहे. भरतला गेल्या वर्षी झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून पदार्पणाची संधी मिळाली नाही पण त्याने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या दुखापतीनंतर किपिंग करून सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे पंतच्या जागी भरतचा विचार केला जाऊ शकतो.
2. रिद्धिमान साहा
टीम इंडियामध्ये अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. आणि बेंच स्ट्रेंथवरील अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा संघात सामील होण्यास तयार आहे. साहाचे यष्टिरक्षण कौशल्य पंतच्या तुलनेत खूपच चांगले आहे. साहाने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले असून तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पंतच्या जागी संधी दिली जाऊ शकते.