IND vs SA 2nd Test Day 1: ‘करिअर वाचवण्यासाठी एकच डाव शिल्लक’; जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप पुजारा, रहाणेवर भारतीय दिग्ग्जचे मोठे भाष्य
जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा आणि रहाणे Proteas वेगवान गोलंदाज डुआन ऑलिवरच्या सलग चेंडूवर बाद झाले.
IND vs SA 2nd Test Day 1: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्याकडे सोमवारी जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर त्यांची कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी आणखी एक डाव शिल्लक आहे. पुजारा आणि रहाणे Proteas वेगवान गोलंदाज डुआन ऑलिवरच्या (Duanne Olivier) सलग चेंडूवर बाद झाले. जवळपास तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऑलिवरने प्रथम पुजाराला काही अतिरिक्त बाऊन्ससह माघारी धाडलं. पुजारा डिफेन्सिव शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागून पॉईंटवर टेंबा बावुमाच्या हातात गेला. रहाणेला पुढील चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पुजाराने 33 चेंडूत तीन धावा केल्या तर रहाणे गोल्डन डकवर बाद झाला. (IND vs SA 2nd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेचा दबदबा; Lunch पर्यंत भारताच्या 3 बाद 53 धावा, KL Rahul वर मोठी जबाबदारी)
“त्या दोन विकेटनंतर कोणीही असे म्हणू शकतो की पुजारा आणि रहाणे या दोघांकडे त्यांची कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी फक्त पुढचा डाव आहे,” दोन वरिष्ठ फलंदाज बाद झाल्यानंतर समालोचन करताना गावस्कर म्हणाले. “संघातील त्यांच्या स्थानाबाबत प्रश्न विचारले गेले आहेत आणि आता हे दोन बाद झाल्यामुळे त्यांच्याकडे फक्त एक डाव शिल्लक आहे. जर आणखी एक डाव असेल आणि भारत ज्या मार्गाने जात असेल तर असे दिसते की त्यांच्यासाठी काहीतरी धावा करण्यासाठी आणखी एक डाव असेल आणि कदाचित संघात त्यांची जागा कायम ठेवू शकेल,” भारताचे माजी कर्णधार पुढे म्हणाले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटीत संघाचा नेतृत्व करत असलेल्या केएल राहुल आणि सलामीवीर मयंक अग्रवाल यांनी 36 धावांची सलामी भागीदारी केली, ज्यानंतर पुजारा आणि राहुल भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ऑलिवरच्या दोन विकेट्सने दक्षिण आफ्रिकेला सामन्यात पुनरागमन करून आणि भारताने लंचब्रेकपर्यंत 53/3 धावांपर्यत मजल मारली.
जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजीची रणनीती स्पष्ट होती. शॉर्ट-पिच गोलंदाजी आणि फलंदाजाच्या विशेषतः चेतेश्वर पुजाराच्या जवळ कारण तो सेंच्युरियन येथे अशाच चेंडूचा बळी ठरला होता आणि दक्षिण आफ्रिकेचा गेम प्लॅन इथेही तसाच होता. पुजाराविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने आपले नियोजन स्पष्ट ठेवले. पुजाराला संधी मिळत राहिली आणि नशीबाने यंदाही त्याच्या बाजूने साथ दिली नाही. पण या सातत्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला मिळाला आणि पुजारा अखेर ऑलिवरचा बळी ठरला. पुढच्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेही माघारी परतला आणि ऑलिवरचा हा 50 वा कसोटी विकेट ठरला.