IND vs SA Series 2021-22: आता राहुल द्रविडची होणार खरी ‘कसोटी’, टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकाला ‘या’ 4 प्रश्नांवर काढावा लागणार तोडगा!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याने तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षांत विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या जोडीने जबरदस्त यश मिळवून दिले आहे. त्यामुळे राहुल द्रविड आणि विराट हेच यश एकत्र मिळवू शकतील का असा प्रश्न उदभवत आहे? द्रविडला कोणत्या 5 समस्यांना सामोरे जावे लागणार आहे ते खालीलप्रमाणे आहेत.
IND vs SA Test Series: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याने तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळली जाणार आहे. टीम इंडियासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि यावेळी त्यांना इतिहास रचण्याची संधी आहे. गेल्या काही वर्षांत विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला जबरदस्त यश मिळवून दिले आहे. शास्त्री यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकली. पण आता प्रश्न असा आहे की, राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि विराट हेच यश एकत्र मिळवू शकतील का? दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa Tour) केवळ खेळाडूंचीच नाही तर द्रविडची परीक्षा होईल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोणत्या 5 समस्यांना सामोरे जावे लागणार आहे ते खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SA 1st Test: टीम इंडियाला प्लेइंग XI बाबत Wasim Jaffer यांचा सल्ला, सेंच्युरियन टेस्टसाठी भारताच्या संघरचनेवर केला खुलासा)
1. वादानंतर संघाचे मनोबल उंचावणे
दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कोहलीने बीसीसीआय विरोधात ज्या प्रकारची वक्तव्ये केली होती, त्याचा परिणाम संघावर झाला असावा असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. विराट कोहलीचे विधान बीसीसीआयला थेट आव्हान देणारे आहे, अशा परिस्थितीत कसोटी कर्णधार आपल्या खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींचाही विचार करत असतील. कर्णधार एखाद्या प्रकरणात अडकला तर त्याचा परिणाम संघातील खेळाडूंवरही दिसून येतो. त्यामुळं द्रविडला मालिकेवर संघाचे लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यावा लागेल.
2. कमकुवत मध्यम क्रम
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाची मधली फळी अत्यंत खराब आहे. पुजारा लयीत नाही तर रहाणेची बॅटही शांत आहे. अशा परीस्थितीत नकारात्मकतेशी झुंजणाऱ्या पुजारा-रहाणेला द्रविड कशाप्रकारे सकारात्मक पाठिंबा देतात आणि त्यांना लय मिळवून देण्यात द्रविडची भूमिका महत्वाची असेल.
3. विराट कोहलीचा खराब फॉर्म
दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करण्यात विराट कोहली अपयशी ठरला आहे. कोहलीने शतक न करणे ही टीम इंडियासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. विराटने धावा केल्यास टीम इंडियाच्या विजयाची शक्यता वाढते आणि संपूर्ण युनिट वेगळ्या उत्साहाने खेळतात. द्रविडला ही गोष्ट चांगलीच माहीत असेल आणि त्यामुळेच तो या दौऱ्यापूर्वी विराटच्या फलंदाजीवर विशेष लक्ष देत आहे. विराटला लवकरात लवकर लयीत आणणे द्रविडसमोर मोठे आव्हान असेल.
4. प्लेइंग XI वर घ्यावा लागणार कठोर निर्णय
रहाणे आणि पुजारा फॉर्ममध्ये नसल्यामुळे तसेच मुंबईकर फलंदाजाने उपकर्णधारपद गमावल्यावर त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर संभ्रम निर्माण झाला आहे. सेंच्युरियनवर पहिल्या कसोटी सामन्यातही दोघे फ्लॉप ठरल्यास संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. आणि हा निर्णय घेण्यात द्रविडची महत्त्वाची भूमिका असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)