IND vs SA 1st Test: पहिल्या टेस्टमधून रिषभ पंत याला डच्चू, रिद्धिमान साहा याला प्राधान्य दिल्याने Netizens धक्क्यात
भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. काहींना वाटले की, साहाची निवड योग्य आहे, तर काहींचे असे मत आहे की,साहाऐवजी अन्य युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे होती.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेतील पाहिला सामना खेळला जाणार आहे. या मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली याने पहिल्या मॅचसाठी प्लेइंग इलेव्हनमधून रिषभ पंत (Rishabh Pant) याला डच्चू देण्यात आला असल्याचे सांगितले. पंतच्या जागी अनुभवी विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्ट मालिकेत पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती, ज्यामुळे त्याची संघातील स्थान धोक्यात पडले होते. दरम्यान, तब्बल वर्षभराच्या काळानंतर साहा संघात पुनरागमन करत आहे. (IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रिद्धिमान साहा करणार विकेटकीपिंग, पहिल्या टेस्टमध्ये रिषभ पंत टीम इंडियातुन याला वगळले)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात खेळपट्टीवर टूर्न होण्याची संधी आहे आणि यष्टीरक्षक म्हणून त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 34 वर्षीय साहा नक्कीच चांगला पर्याय ठरेल. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. काहींना वाटले की, साहाची निवड योग्य आहे, तर काहींचे असे मत आहे की, या निर्णयामुळे पंतचा आत्मविश्वास गंभीरपणे ढासळू शकतो. दुसरीकडे, काही म्हणाले की, साहाऐवजी अन्य युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे होती. पहा सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया:
त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट असलेल्या पंतला वगळण्यात आल्याने हे आश्चर्यकारक आहे
पूर्णपणे वाईट निर्णय, कोहलीने तरुण कौशल्यांना अधिक संधी दिली पाहिजे
कसोटीत त्यांनी के.एस. भरत याला संधी दिली पाहिजे
पंतच्या जागी रिद्धिमान साहाला खेळवण्याचा निर्णय घेतल्यावर कोहली आणि शास्त्री
पंतला जास्त सामन्यांमध्ये न खेळवल्यास तो भारतासाठी विकेटकिपिंग कशी सुधारेल?
दुसरीकडे, साहाने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय टेस्ट सामना खेळला होता. या सामन्यात दुखापत झाल्यामुळे साहाला संघाबाहेर बासावे लागले. त्यानंतर पंतला विकेतकीपर-फलंदाज म्हणून संघात जागा मिळाली. मात्र, पंतला मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेता आला नाही. आणि त्याचाच फटका त्याला बसला आणि त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे. साहाऐवजी रविचंद्रन अश्विन याचा देखील संघात समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नव्हती. यंदा, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्यात नवीन सलामीची जोडी आणि दोन फिरकी गोलंदाज यांच्यासह मैदानात उतरेल.