IND vs SA 1st Test Day 3: डीन एल्गार याचे संघर्षपूर्ण शतक; टेस्ट कारकिर्दीतला 12 वे, टीम इंडियाविरुद्ध पहिले
एल्गारने 176 चेंडूत शतक पूर्ण केले. दरम्यान, एल्गारच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 12 वे टेस्ट शतक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गार (Dean Elgar) याने भारतीय संघा (Indian Team) विरुद्ध पहिले टेस्ट शतक केले आहेत. एल्गारने षटकार मारत शतक पूर्ण केले. त्याने 175 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 100 धावांचा टप्पा ओलांडला. दरम्यान, एल्गारच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 12 वे टेस्ट शतक आहे. महत्वाचे म्हणजे, एल्गार हा 2010 नंतर भारतविरुद्ध टेस्ट शतक करणारा पहिला दक्षिण आफ्रिकाई क्रिकेटपटू आहे. 2010 मध्ये हाशिम अमला (Hashim Amla) याने शेवटी टीम इंडियाविरुद्ध टेस्ट शतक केले होते. एल्गारने याआधी ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि इंग्लंड संघाविरुद्ध प्रत्येकी 2 शतक केले आहेत. याआधी एल्गारने कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याच्यासह शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. एल्गार आणि डु प्लेसी यांनी पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. डु प्लेसिसने अर्धशतक केले आणि लंचनंतर काही वेळाने रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या गोलंदाजीवर 55 धावांवर चेतेश्वर पुजारा याच्या हाती झेल बाद झाला. (IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा याने केली ऐतिहासिक खेळी; विराट कोहली याने केले असे काही ज्याने चाहते झाले खुश Video)
यापूर्वी, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पहिला डाव 7 बाद 502 धावांवर दुसऱ्या दिवशी घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकन 39 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर, चौथ्या दिवशी खेळ सुरु होताच डीन एल्गार आणि उपकर्णधार टेंबा बावुमा आक्रमक खेळ खेळत होते. पण, इशांत शर्मा याने बावुमाला 18 बावुमाला एलबीडब्ल्यू आउट करत तिसऱ्या दिवशी भारताला चौथे यश मिळवून दिले. यादरम्यान, एल्गारने 14 वे अर्धशतक पूर्ण केले.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताने पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवीन सलामीची जोडी मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मयंक आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी 317 धावांची भागीदारी केली. अन्य कोणताही भारतीय फलंदाज मोठा स्कोर करू शकला नाही. मयंकने 215 धावा केल्या, तर रोहित 176 धावांवर बाद झाला.