IND vs SA 1st Test Day 1: ओपनिंगला येत रोहित शर्मा ने केले पहिले अर्धशतक, Lunch पर्यंत टीम इंडियाने केल्या 91 धावा

आणि आता सलामी फलंदाज म्हणून 5 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने अर्ध शतक पूर्ण केले. हे रोहितचे टेस्टमधील 11 अर्धशतक आहे. भारताने लंच पर्यंत एकही विकेट ना गमावता 91 धावा केल्या.

रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

टीम इंडियाचा 'हिटमॅन' आता त्याच्या खऱ्या फॉर्ममध्ये आला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टेस्ट मालिकेदरम्यान पहिल्यांदा टेस्टमध्ये सलामी फलंदाज म्हणून येत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कमालीची फलंदाजी केली आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. यात सर्वांच्या नजरा टेस्टमध्ये पहिल्यांदा सलामीला फलंदाजी करायला आलेल्या रोहितवर आहेत. मयंक अग्रवाल (Mayank Agrwal) याच्या समवेत मैदानावर उतरलेला रोहित लयीत दिसत आहे. त्याने चौकार मारत डावाची सुरुवात केली. आणि आता सलामी फलंदाज म्हणून 5 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने अर्ध शतक पूर्ण केले. 29 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहितने चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून पहिले अर्धशतक आहे, तर त्याच्या कसोटी कारकीर्दीचे हे 11 वे अर्धशतक आहे. (IND vs SA 1st Test Day 1: रोहित शर्मा-मयंक अग्रवाल यांनी केली भारताच्या डावाची सुरुवात, 47 वर्ष जुना विक्रम मोडीत)

भारताने लंच पर्यंत एकही विकेट ना गमावता 91 धावा केल्या. लंचपर्यंत त्याने 84 चेंडूत 52 धावा केल्या आहेत आणि मयांकने 96 चेंडूत 39 धावा करून खेळपट्टीवर खेळत आहे. रोहित यापूर्वी वनडे आणि टी-20 मध्ये सलामी फलंदाज म्हणून खेळला आहे, पण कसोटी सलामीवीरची जबाबदारी त्याला पहिल्यांदाच मिळाली आहे. केएल राहुल याच्या सतत अपयशामुळे रोहितला टेस्टमध्ये सलामी फलंदाज म्हणून पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित टेस्टमध्ये सलामी फलंदाज म्हणून यशस्वी होण्याबाबत विश्वास दाखवला. चाहत्यांमध्ये हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने वनडे आणि टी-20 शैलीप्रमाणे आपल्या डावाची सुरुवात केली.

रोहितने, या मॅचपूर्वी, 27 कसोटी सामन्यात 39.62 च्या सरासरीने 1585 धावा केल्या आहेत, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 10,000 पेक्षा जास्त धावा आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कसोटीत मधल्या फळीत खेळायचा. पहिल्या कसोटीपूर्वी निव्वळ सत्रादरम्यान, सर्वांचे लक्ष रोहितकडे होते, जो संधीचा फायदा घेण्यास आणि कसोटीसंघात त्याचा रेकॉर्ड सुधारण्याच्या प्रयत्नात होता.