IND vs SA 1st Test 2021: पहिल्या कसोटी दरम्यान दक्षिण आफ्रिकेला बसला जोरदार झटका, कोविड-19 च्या आफ्टर-इफेक्ट्समुळे Duanne Olivier सामन्याबाहेर
यजमान संघाचा वेगवान गोलंदाज डुआन ऑलिवर यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) निवड समन्वयक व्हिक्टर Mpitsang यांनी ही माहिती दिली.
सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्कमध्ये भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) एक वाईट बातमी आली आहे. यजमान संघाचा वेगवान गोलंदाज डुआन ऑलिवर (Duanne Olivier) याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) निवड समन्वयक व्हिक्टर Mpitsang यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ऑलिवरला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने पहिल्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. तसेच 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे. रविवारपासून सुरु झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या निस्तेज गोलंदाजीच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर वेगवान गोलंदाज ऑलिवरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (IND vs SA 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?)
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) चे निवड संयोजक व्हिक्टर म्पित्सांग यांच्या मते, कोविड-19 चे परिणाम आणि हॅमस्ट्रिंग निगलमुळे ऑलिवरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. ऑलिवर या वर्षीच्या पहिल्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 12 पेक्षा कमी सरासरीने 28 विकेट घेल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत 21 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने पहिल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. पण जॅन्सनने 17 षटकांत 61 धावा दिल्या आणि भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 272/3 धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये राहुलने नाबाद 122 आणि मयंक अग्रवालने 60 धावांचे योगदान दिले. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीसाठी 117 धावांची भागीदारी करत भारतीय फलंदाजांनी नवीन चेंडूने चांगली कामगिरी बजावली.
व्हिक्टर म्हणाले, “ऑलिवर आता चांगली कामगिरी करत आहे. पण काही आठवड्यांपूर्वी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, त्यामुळे त्याला अनेक दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. यानंतर भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी त्याने कसून सराव केला होता. या कसोटीपूर्वी संघ अंतर्गत सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली, ज्यामुळे निवडकर्त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही.”