IND-W vs PAK-W Women's Asia Cup T20I 2024 Live Streaming: क्रिकेटची आजची सर्वात मोठी लढाई, भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

मात्र, हा सामना पुरुष संघातील नसून महिला संघातील आहे. हा सामना टी-20 फॉरमॅटमध्ये आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ आणि यूएईच्या महिला संघांमध्ये होणार आहे.

IND vs PAK (Photo Credit - X)

Women's Asia Cup T20I 2024 Live Streaming: क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. असेच काहीसे आजही पाहायला मिळते. आशिया कपम 2024 मध्ये (Asia Cup 2024) आज भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना होत आहे. मात्र, हा सामना पुरुष संघातील नसून महिला संघातील आहे. हा सामना टी-20 फॉरमॅटमध्ये आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ आणि यूएईच्या महिला संघांमध्ये होणार आहे. त्यानंतर स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये होईल. श्रीलंका महिला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. स्पर्धेतील सर्व सामने डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.

टीम इंडियाचा अ गटात समावेश

आशिया कप 2024 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात टीम इंडियासोबत पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईच्या संघांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कप 2024 चा अंतिम सामना 28 जुलै रोजी होणार आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

आशिया कप 2024 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 खेळवला जाणार आहे. महिला आशिया चषकाचे सामने स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केले जातील. या स्पर्धेचे थेट प्रवाह Disney + Hotstar वर उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: Women’s Asia Cup T20I 2024: आशिया कपमध्ये सर्वांच्या नजरा असतील 'या' भारतीय खेळाडूंवर, पुन्हा एकदा टीम इंडिया जिंकू शकते विजेतेपद)

हेड टू हेड रेकॉर्ड

आत्तापर्यंत भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघामध्ये एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत. आयसीसी टी-20 विश्वचषक 2016 च्या दिल्लीत झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून 2 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागलेल्या तीन सामन्यांपैकी हा एक सामना होता. दोन्ही देशांच्या महिला संघांमधील हा एकमेव सामना आहे जो आतापर्यंत एकमेकांच्या देशात खेळला गेला आहे. आशिया कपमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या आशिया चषकातही टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.