Ind vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघाच्या सामन्यावेळी खेळाडू-अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसल्याने काहींनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

Ranveer Singh (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघाच्या सामन्यावेळी खेळाडू-अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात (Player's and Match Officials Areas)  दिसल्याने काहींनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. परंतु रणवीरच्या तेथील उपस्थितीवरआईसीसीने (ICC) स्पष्टीकरण दिले आहे. रणीवर हा एक उत्तम अभिनेतासह त्याच्या वागणूकीबद्दल सर्वजण त्याचे फॅन झाले आहेत. तर सामन्यादरम्यान रणवीर याची भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्यासोबत मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर एक अॅनिमेटेड बातचीत सुद्धा झाली.

यामुळे आईसीसीने रणवीर याच्या उपस्थितीवर स्पष्टीकरण दिले असून, रणवीर याने खेळाडूंशी किंवा अधिकाऱ्यांसोबत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान बातचीत केली. त्यामुळे अभिनेत्याच्या तेथील उपस्थितीवर प्रश्न विचारले जाऊ लागले. यावर आईसीसीने त्यावर उत्तर दिले असून रणवीर याने कोणताही नियम किंवा कायद्याचे उल्लंघन केलेले नाही असे म्हटले आहे.

त्याचसोबत आईसीसीच्या अधिकृत विधानात असे म्हटले आहे की, रणवीर याला स्टार स्पोर्ट्सकडून तेथे सादर करण्यात आले होते. तसेच रणवीर खेळाडू आणि अधिकाऱ्यांसोबत बातचीत करत होता त्यावेळी तो खेळाडू किंवा अधिकाऱ्यांच्या अधिकृत क्षेत्रात नव्हता. रणवीर याने फक्त कॉमेन्ट्री करण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावेळी उपस्थित होता असल्याचे ही आईसीसीने सांगितले आहे.(Style मै रहने का! CWC साठी भारतीय संघाने बदलला आपला हेअरस्टाईल, (View Photos)

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान रणवीर याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मोहम्मद शमी आणि शिखर धवन यांच्यासोबत बोलताना दिसला. त्याचसोबत पाकिस्तानचा संघ सामना हरल्यावर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचे सात्वंनसुद्धा करत होता.