ICC WTC Final 2021: टॉससाठी मैदानात पाऊल ठेवताच Virat Kohli ने आपल्या नावावर केला हा खास कीर्तिमान, मोडला MS Dhoni याचा मोठा रेकॉर्ड

न्यूझीलंड विरोधात साउथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या ऐतिहासिक सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) संघाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) रेकॉर्ड मोडला आणि एक नवीन कीर्तिमान आपल्या नावावर केला.

एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंड (New Zealand) विरोधात साउथॅम्प्टन (Southampton) येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या ऐतिहासिक सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा (Indian Teamm) विद्यमान कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) संघाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) रेकॉर्ड मोडला आणि एक नवीन कीर्तिमान आपल्या नावावर केला. भारताचा माजी कर्णधार धोनीला मागे टाकून विराट कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा भारताचा नंबर-1 कॅप्टन ठरला आहे. विराटचा कर्णधार म्हणून साउथॅम्प्टनवरील अजिंक्यपदाचा सामना कारकिर्दीतील 61वा सामना आहे. धोनीने कर्णधार म्हणून 60 टेस्ट सामन्यात टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व केले आहेत. शिवाय, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा आणि पाकिस्तानचा मिसबाह-उल-हक आहेत ज्यांनी प्रत्येकी 56 कसोटी सामन्यात आपल्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. (IND vs NZ WTC Final 2021: केन विल्यमसनने जिंकला टॉस, पहिले घेतला बॉलिंगचा निर्णय; हे 11 किवी भारताला देणार टक्कर)

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज ग्रीम स्मिथ यांनी 109 कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक सामने खेळले आहेत. इतकंच नाही तर आयसीसी टूर्नामेंट फायनलमध्ये तीनही स्वरूपात खेळणारा कोहली जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडूही ठरला आहे. 2011 वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात विराट खेळला होता  जिथे टीम इंडियाने लंकन संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2015 टी-20 वर्ल्ड कप फायनल आणि आता कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळत विक्रमाची कोहलीने विक्रमाची नोंद केली. या तिघांव्यतिरिक्त, तो 2008 मध्ये आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्येही खेळला आणि 2013 व 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल खेळला ज्यामध्ये पहिल्या अंतिम सामन्यात विजय मिळवला तर दुसऱ्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाला. अशाप्रकारे तो आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, फायनल सामन्यात किवी संघाने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाला साऊथॅम्प्टनमध्ये पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. साऊथॅम्प्टनच्या परिस्थितीत बदल होऊनही भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही आहे, तर न्यूझीलंडने त्यांच्या इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाजाचा समावेश केलेला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif