IND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात Virat Kohli याची मस्ती पाहून Rohit Sharma याची रिअक्शन एकदा पाहाच (Watch Video)

कोहली हे असे करत असताना त्याच्या शेजारी असलेला रोहित शर्माने विराटकडे बघून इशारा केला, यानंतर दोघं फिल्डिंगसाठी उभे राहिले.

विराट कोहली-रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

पावसाच्या व्यत्ययानंतर साऊथॅम्प्टन (Southampton) येथे अखेरीस पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या अगदी अगोदर, साऊथॅम्प्टन येथील थंड हवामान पाहता विराट कोहली (Virat Kohli) शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी व उब मिळवण्यासाठी उड्या मारताना दिसला. कोहली हे असे करत असताना त्याच्या शेजारी असलेला रोहित शर्माने (Rohit Sharma) विराटकडे बघून इशारा केला, यानंतर दोघं फिल्डिंगसाठी उभे राहिले. भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट मैदानावर नेहमीच सक्रिय असतो. सामन्यादरम्यान आपल्या सहखेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी तो सर्वतोपरीने प्रयत्नशील असतो. पण इंग्लंडमधील हवामानाशी जुळवून घेताना आज स्वतः विराट देखील संघर्ष करताना दिसला. (IND vs NZ WTC Final 2021: विजेतेपदाचा निर्णायक सामना अनिर्णीत राहिल्यास टीम इंडियाला फायदा की नुकसान?)

अपेक्षेप्रमाणे हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते भारताच्या स्टार क्रिकेटरच्या हावभावावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये विराट आणि रोहित शर्मा स्लिपमध्ये उभे आहेत. विराट सामन्यादरम्यान मैदानात विचित्र हावभाव करताना आणि थंडीमुळे उड्या मारतानाही दिसला. त्याचवेळी रोहित कर्णधाराला असे करताना पाहून चकित झाला आणि खेळाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करताना विनोदी रिअक्शन दिली. पाहा हा व्हिडिओ: 

दरम्यान, टीम इंडिया न्यूझीलंडचा पहिला डाव लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसर्‍या डावात रोहित शर्मा आणि विराट कोहली संघासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. रोहित 34 धावांवर बाद झाला तर कर्णधार कोहली खूप संयमाने खेळला पण त्याने अर्धशतक याच्या सहा धावांनी हुकले व तो 44 धावा करून माघारी परतला. विराटला आयपीएल 2021 मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सहखेळाडू काईल जेमीसनने पायचीत करत पॅव्हिलियनच रस्ता दाखवला. दुसरीकडे, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला दावा 217 धावांवर संपुष्टात आला. पावसामुळे या सामन्याचा पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, तर उरलेल्या दोन दिवसात खराब प्रकाशामुळे दिवसाच्या ठरलेल्या ओव्हर पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तसेच चौथ्या दिवसाचा खेळ देखील पावसाने धुवून काढला.



संबंधित बातम्या