IND vs NZ WTC Final 2021: Michael Vaughan यांनी टीम इंडियाला पुन्हा मारला टोमणा, म्हणाले- 'असे झाले असते तर न्यूझीलंड बनला असता विजेता'

"ही वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप उत्तर दिशेला खेळली गेली असती तर एक मिनिटांचा खेळही चुकला नसता!! न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता," वॉन यांनी ट्विटर पोस्टमध्ये शेअर केले.

माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

IND vs NZ WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात पावसाने कहर केला आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे धुवून निघाल्यावर पाचव्या दिवशी पुन्हा सामन्याच्या सुरुवातीला विलंब झाला. सामना सुरु होण्यात उशीर होत असल्यामुळे सोशल मीडियावर यूजर्सने बॅटिंग केली आणि पाऊस व संघांशी संबंधित मिम्स व प्रतिक्रिया शेअर केल्या. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी आपल्या ट्विटद्वारे भारतीय संघाची (Indian Team) पुन्हा एक खिल्ली उडवण्याची संधी साधली. "ही वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप उत्तर दिशेला खेळली गेली असती तर एक मिनिटांचा खेळही चुकला नसता!! न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता," वॉन यांनी ट्विटर पोस्टमध्ये शेअर केले. (IND vs NZ WTC Final 2021: इशांत-शमीची भेदक गोलंदाजी; लंचपर्यंत न्यूझीलंडचा 135 धावांवर अर्धा संघ तंबूत, Kane Williamson याची संयमी बॅटिंग)

वॉन गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे आणि त्यांनी काही चर्चित ट्विट केले आहेत. वॉनने भारतीय क्रिकेट चाहत्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला ज्यात ते चांगले काम करत असल्याचे दिसते आहे कारण ते ट्विटरवर नियमितपणे ट्रेंड करत आहेत. या उत्तरार्धात न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स झाला असावा, असा दावा करत 46 वर्षीय वॉ यांनी पुन्हा एकदा भारतीय संघावर निशाणा साधला आहे. न्यूझीलंडने साऊथॅम्प्टन येथे टीम इंडियाला पहिल्या डावात 217 धावांवर गुंडाळत आघाडी घेतली होती. काईल जेमीसनने विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवत पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी 70 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.

तथापि, पहिल्या दिवसाप्रमाणे पावसाने चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सामन्यात एंट्री मारली आणि संपूर्ण दिवस धुऊन काढला. त्यामुळे आता दोन दिवसाचा खेळ शिल्लक असताना दोनच शक्यता आहेत. पहिली म्हणजे दोन संघांपैकी एक विजेता संघ तर दुसरा म्हणजे दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद. वॉन यांनी न्यूझीलंडला अनेक वेळा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत करण्यासाठी अनेकदा जोरदार पाठिंबा दर्शविला होता.