IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: टीम इंडिया 156 धावांवर ऑलआऊट, मिचेल सँटनर घेतल्या 7 विकेट; न्यूझीलंडकडे 103 धावांची आघाडी
दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला आहे. यासह न्यूझीलंडने 103 धावांची आघाडी घेतली आहे.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला आहे. यासह न्यूझीलंडने 103 धावांची आघाडी घेतली आहे.
मिचेल सँटनर घेतल्या सर्वाधिक सात विकेट
दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला काय खास सुरुवात करता आली नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 30-30 धाव केल्या. तर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 1 धावावर बाद झाला त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या. दुसरीकडे न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर सर्वाधिक सात विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Most Wicket in Test: अश्विन अण्णाचा मोठा करिष्मा! कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत घेतली मोठी झेप, तर शेन वॉर्नचा विक्रमही काढला मोडीत)
वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सात विकेट
तत्तपुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. मिचेल सँटनर 33 धावा करून बाद झाला. टॉम लॅथम 15 धावा करून बाहेर पडला. भारताकडून सुंदरने 7 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या.