IND vs NZ 1st Test: वेलिंग्टनमध्ये टिम साऊथी ची ऐतिहासिक बॉलिंग; न्यूझीलंडमध्ये 300 विकेट घेणारा पहिला गोलंदाज, भारताचा 'हा' फलंदाज बनला शिकार

भारत-न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथीने भारताचा सलीम फलंदाज मयंक अग्रवालला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला आणि न्यूझीलंडच्या भूमीवर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळवून 300 गडी बाद करणारा पहिला गोलंदाज बनला.

टिम साऊथी (Photo Credit: IANS)

भारत (India) -न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात किवी गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत टीम इंडिया फलंदाजांच्या नाकी-नऊ आणले. सामना चौथ्या दिवशी अवघ्या दोन तासांत संपला, पान तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथी (Tim Southee) ने आपल्या नावावर एक विक्रम नोंदविला आहे. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी साऊथी ने भारताचा सलीम फलंदाज मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला आणि न्यूझीलंडच्या भूमीवर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळवून 300 गडी बाद करणारा पहिला गोलंदाज बनला. यापूर्वी हा विक्रम त्याच्या सहकारी आणि माजी किवी खेळाडू डॅनियल व्हेटोरी (Daniel Vettori) याच्या नावावर होता. पहिल्या डावातही साऊदीने टीम इंडियाविरूद्ध शानदार गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या डावातही तो त्याचा खेळ सुरू ठेवली. (IND vs NZ 1st Test: वेलिंग्टन सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने 10 विकेटने विजय मिळवत रचला इतिहास)

साऊथीने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावात भारताच्या महत्वाच्या फलंदाजांना आऊट करत एकूण 5 गडी बाद केले. पण, तिसऱ्या दिवशी घेतलेली मयंकची विकेट त्याच्यासाठी संस्मरणीय ठरली. मयंकची विकेट त्याच्या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची 300 वी विकेट होती. व्हेटोरीने यापूर्वी न्यूझीलंडमध्ये एकूण 299 विकेट्स घेतल्या होत्या. आता साऊथीने व्हिटोरीला मागे सोडले आहे आणि न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किवी देशांत सर्वाधिक विकेट्स मिळविल्या आहेत.

वेलिंग्टनमधील सामन्यात साऊथी, ट्रेंट बोल्ट यांच्या दुसऱ्या डावातील प्रभावी कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या दिवशी भारताविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या डावाप्रमाणे टीमचे फलंदाज दुसऱ्या डावातही साऊथी-बोल्टच्या जोडीविरुद्ध संघर्ष करताना दिसले. साऊथी आणि बोल्टने पूर्ण सामन्यात 20 पैकी 14 विकेट्स घेतल्या. वेलिंग्टनमधील विजय न्यूझीलंडचा हा 100वा कसोटी विजय ठरला. आता दोन्ही देशांमधील पुढील सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान खेळला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif