IND vs ENG, U19 World Cup Final 2022: भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 विश्वचषक फायनल सामन्याचे Live स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहणार?
आज थोड्याच वेळात भारत आणि इंग्लंड संघात अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडिया सलग चौथ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरली आहे. दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
U19 World Cup Final 2022: अंडर-19 विश्वचषक (Under-19 World Cup) आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज थोड्याच वेळात भारत (India) आणि इंग्लंड (Englnd) संघात अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम (U19 World Cup Final) सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील विजेतेपदाचा आजचा सामना अटीतटीचा होणार असे अपेक्षित आहे कारण दोघे आतापर्यंत स्पर्धेत अजेय राहिले आहे त्यामुळे स्पर्धेत पहिल्या पराभवासह जेतेपदाची स्वप्न कोणत्या संघाचे स्वप्न भंग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. दरम्यान ब्रिटिश टीम आपल्या दुसरे अंडर-19 जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक असेल तर यश धुलच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) पाचव्यांदा अंडर-19 चॅम्पियन बनण्याच्या निर्धारित असेल. टीम इंडिया सलग चौथ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरली आहे. दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. (U19 World Cup 2022: ‘बेबी एबी’ Dewald Brevis ने अंडर-19 विश्वचषकात घडवला इतिहास, शिखर धवनचा रेकॉर्ड मोडून पाडला धावांचा पाऊस)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट मैदान, अँटिग्वा येथे होणार आहे. हा सामना 5 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. तर सामना सुरू होण्याच्या अर्धा तासपूर्वी नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध भाषिक वाहिन्यांवर लाइव्ह प्रसारित केला जाईल. तसेच Disney + Hotstar अॅपवर या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग भारतीय चाहत्यांसाठी उपलब्ध असेल. पण यासाठी तुम्हाला या अॅपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
इंग्लंड U19 संघ: टॉम प्रेस्ट (कॅप्टन), अॅलेक्स हॉर्टन (विकेटकीपर), जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, जेम्स र्यू, विल्यम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, जेम्स सेल्स, थॉमस ऍस्पिनवॉल, जोशुआ बायडेन, जेम्स कोल्स, फतेह सिंह, नॅथन बार्नवेल, बेंजामिन क्लिफ
भारत अंडर 19 संघ: यश धुल (कॅप्टन), दिनेश बाना (विकेटकीपर), अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंह, शेख रशीद, राजवर्धन हंगरगेकर, निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, विकी ओस्तवाल, रवी कुमार, मानव पारख, सिद्धार्थ यादव, अवनेश गौतम, गर्व सांगवान.