IND vs ENG Test Series 2021: टीम इंडिया चन्नईच्या मैदानावर नेहमीच ठरलीय शिकारी, प्रतिस्पर्ध्यांचा पाडलाय फडशा; पहा संघाची Chennai टेस्टमधील रेकॉर्ड

5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. चेन्नईचे मैदान टीम इंडियासाठी नेहमीच खास ठरले आहेत. संघाने या मैदानावर अनेक सामने जिंकले आहेत. या लेखातही आपण चेन्नई कसोटीमधील भारतीय संघाच्या रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील कसोटी मालिकेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नईच्या (Chennai) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळला जाईल. भारत दौर्‍यावर 4 कसोटी सामन्याव्यतिरिक्त इंग्लंड संघ 5 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिले दोन्ही कसोटी सामने चेन्नईत तर शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. मालिकेचा तिसरा कसोटी सामना डे-नाईट सामना असेल.चेन्नई येथे पहिला सामना 5 ते 9 फेब्रुवारी, तर दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे. चेन्नईचे मैदान टीम इंडियासाठी (Team India) नेहमीच खास ठरले आहेत. संघाने या मैदानावर अनेक सामने जिंकले आहेत. या लेखातही आपण चेन्नई कसोटीमधील भारतीय संघाच्या रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्ट सामन्यातून जसप्रीत बुमराह भारतात डेब्यूसाठी सज्ज, इंग्लंड फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचे ‘बूम बूम’ पुढे आव्हान)

चेन्नईमध्ये भारताचा रेकॉर्ड

चेन्नईमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 32 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 14 सामने भारत जिंकले आहेत, तर 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले असून 11 सामने अनिर्णीत राहिले आहेत. चेन्नईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात सर्वोत्कृष्ट संघाची धावसंख्या 7 विकेटसाठी 759 आहे जी भारतीय टीमने डिसेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध नोंदवली होती. या मैदानावर 1977 मध्ये भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध सर्वात कमी 83 धावसंख्येवर ऑलआऊट झाली होती.

सचिन तेंडुलकरने भारत-इंग्लंड मालिकेत केल्या सर्वाधिक धावा

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने इंग्लंडविरुद्ध 32 सामन्याच्या 53 डावांमध्ये 2535 धावा केल्या आहेत, ज्यात 7 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी इंग्लंडकडून अ‍ॅलिस्टर कुकने भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. कुकने भारताविरुद्ध एकूण 38 टेस्ट सामन्यात 2431 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार कुकने भारताविरुद्ध टेस्ट सामन्यात एकूण 7 शतक आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत.

जेम्स अँडरसनने घेतल्या सर्वाधिक विकेट्स

भारत आणि इंग्लंड यांच्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. अँडरसनने भारताविरुद्ध 27 टेस्ट सामन्यात सर्वाधिक 110 विकेट घेतल्या आहेत तर भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट एस चंद्रशेखरच्या नावावर आहेत. चंद्रशेखरने इंग्लंडविरुद्ध 23 कसोटी सामने खेळत 95 विकेट घेतल्या आहेत.