IND vs ENG Test 2025: Jasprit Bumrah ने मोडला वसीम अक्रमचा विक्रम; बनला सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने सेना देशात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत वसीम अक्रमचा विक्रम मोडला आहे. बुमराह सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज बनला आहे. त्याने बेन डकेटला बाद करून ही कामगिरी केली.
IND vs ENG 1st Test 2025: जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असेल आणि कोणताही विक्रम झाला नसेल असे दुर्मिळ आहे. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, जेव्हा इंग्लंडचा (ENG vs IND 2025) संघ 471 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा कर्णधार गिलसह संपूर्ण संघाला त्याच्याकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती. त्यानेही निराश केले नाही आणि पहिल्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर जॅक क्रॉलीला बाद करून टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली. दुसरीकडे ऑली पोप आणि बेन डकेटने दुसऱ्या विकेटसाठी शानदार फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यासाठी कर्णधार गिलने चेंडू बुमराह(Jasprit Bumrah)कडे सोपवला आणि त्याने बेन डकेटला क्लिन बॉलिंग करून ही भागीदारी मोडली.
बुमराहने डकेटला बाद करून हा विक्रम मोडला
जसप्रीत बुमराहने डकेटची विकेट घेताच त्याने पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रम मोडला. खरंतर, SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक विकेट्स घेण्याचे श्रेय वसीम अक्रमकडे होते. परंतु आता बुमराहने अक्रमला मागे टाकले आहे. आता तो SENA देशांमध्ये सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज बनला आहे.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 64 विकेट्स घेतल्या आहेत तर न्यूझीलंडविरुद्ध सर्वात कमी 6 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने इंग्लंडविरुद्ध 10 सामन्यांमध्ये 39 विकेट्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 सामन्यांमध्ये 38 विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे, त्याने SENA देशांमध्ये एकूण 147 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो या बाबतीत सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज आहे.