SOR vs LAKR 12th Match, Major League Cricket 2025 Live Streaming: सिएटल ऑर्कास आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स सामना; मेजर लीग क्रिकेट 2025 चा 12 वा सामना कसा पहाल?
मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेचा आजचा सामना ग्रँड प्रेअरी स्टेडियमवर होत आहे. आज 22 जून, दुपारी 3 वाजता सामना होणार आहे.
Seattle Orcas vs Los Angeles Knight Riders 12th Match, Major League Cricket 2025 Live Streaming: सिएटल ऑर्कास आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघात (SOR vs LAKR) मेजर लीग क्रिकेट 2025 चा 12 वा सामना होत आहे. हा सामना ग्रँड प्रेअरी स्टेडियमवर होत आहे. आज 22 जून रोजी दुपारी 3 वाजता सामना होणार आहे. मेजर लीग क्रिकेट 2025(Major League Cricket 2025) पॉइंट टेबलमध्ये सध्या दोन्ही संघ तळाशी आहेत. सिएटल ऑर्कास -2.869 रनरेटसह पाचव्या साथानावर आहे. तर, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स -3.367 रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आत्तापर्यंत 3 सामने खेळले आहेत. मात्र, त्यांनी खेळलेले सर्व सामने गमावलेले आहेत. एकातही विजय मिळवता आलेले नाही. पॉइंट टेबलमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर, टेक्सास सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर वॉशिंग्टन फ्रीडम आणि चौथ्या क्रमांकावर एमआय न्यू यॉर्क आहे.
सिएटल ऑर्कास आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स सामना कधी खेळला जाईल?
मेजर लीग क्रिकेट 2025 चा 12 वा सामना आज 22 जून, दुपारी 3 वाजता सामना होणार आहे.
सिएटल ऑर्कास आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स सामना कुठे खेळला जाईल?
मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेचा आजचा सामना यू एसमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होत आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू:
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघ: अॅलेक्स हेल्स, सुनील नारायण, उन्मुक्त चंद (विकेटकीपर), सैफ बदर, रोवमन पॉवेल, मॅथ्यू ट्रॉम्प, जेसन होल्डर (कर्णधार), आंद्रे रसेल, शॅडली व्हॅन शाल्कविक, कॉर्न ड्राय, तनवीर संघा, आंद्रे फ्लेचर, नितीश कुमार, अली खान, आदित्य गणेश, स्पेन्सर जॉन्सन, शेरफेन रुदरफोर्ड, डोमिनिक ड्रेक्स, कार्तिक गट्टेपल्ली
सिएटल ऑर्कास संघ: शायन जहांगीर (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, आरोन जोन्स, काइल मेयर्स, हेनरिक क्लासेन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, सिकंदर रझा, हरमीत सिंग, जसदीप सिंग, कॅमेरॉन गॅनन, ओबेद मॅकॉय, गुलबदिन नायब, सुजित नायक, स्टीव्हन टेलर, वकार सलामखेल, फजलहक फारुकी, राहुल जरीवाला, अली शेख, अयान देसाई
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

