IND vs ENG 2nd Test 2021: रोहित शर्माच्या फॉर्मने वाढवलं टीम इंडियाचं टेंशन, दुसऱ्या टेस्ट सामन्यात मोठी खेळी करण्यावर असेल दबाव
तथापि, यासाठी रोहित शर्मासारख्या नामांकित खेळाडूंनी दुसर्या कसोटीत आपली लय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावे अशी टीमला अपेक्षित असेल. रोहित इंग्लंडविरुद्ध मागील दोन्ही डावात फेल झाला आहे.
IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पहिला टेस्ट सामना गमावल्यावर भारतीय संघावर आता दुसर्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणे गरजेचे आहे. चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याचा दावा कायम ठेवण्यासाठी टीम इंडियापुढे ही अंतिम संधी आहे. तथापि, यासाठी त्यांना आपल्या स्टार खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा असतील. कर्णधार विराट कोहलीची सर्वात मोठी चिंता त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा फॉर्म आहे आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) सारख्या नामांकित खेळाडूंनी दुसर्या कसोटीत आपली लय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावे अशी टीमला अपेक्षित असेल. संघाचा स्टार सलामीवीर रोहितच्या फॉर्मबद्दल बोलायचे तर काही काळापासून त्याने खूप निराशाजनक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्ट सामन्यात 52 धावांची अर्धशतकी खेळी करणारा रोहित इंग्लंडविरुद्ध मागील दोन्ही डावात फेल झाला आहे. (IND vs ENG 2nd Test: कुलदीप यादव याच्यासह तिसऱ्या स्पिनरसाठी ‘या’ खेळाडूमध्ये चुरस, Axar Patel कसोटी डेब्यूच्या तयारीत)
ऑस्ट्रेलियामधेही रोहित फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याने फक्त एकच अर्धशतक ठोकले. अशास्थितीत, टीम इंडियाला उर्वरित सामने जिंकून घ्यायचे असतील तर रोहितला फॉर्मात मिळवणे महत्वाचे आहे. शिवाय, कसोटी संघात आपले स्थान कायम ठेवण्यासाठी देखील रोहितला आगामी दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी करणे अपेक्षित आहे. रोहित जर इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अपयशी झाल्यास संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घेणे भाग पडेल. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पहिल्यांदाच 'हिटमॅन' ओपनर म्हणून मैदानात उतरला होता. त्या सामन्यातील दोन्ही डावात त्याने शतके ठोकली. यानंतर त्याने रांचीमधील मालिकेच्या तिसर्या सामन्यात 212 धावा केल्या. रोहितने नंतर खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे 6, 21, 26, 52, 44, 7 आणि आता 6 आणि 12 धावा केल्या आहेत. रोहितच्या टेस्ट करिअरबद्दल बोलायचे तर ती आजवर चमकदार राहिली आहे. त्याने 34 सामन्यांत 45 च्या सरासरीने 2270 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने सहा शतक, 11 अर्धशतक आणि एक दुहेरी शतकही केले आहेत.
दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या चेन्नई टेस्टसाठी इंग्लंडने 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघातचार बदल झाले आहेत. जेम्स अँडरसन, जोस बटलर, डॉम बेस यांना विश्रांती देण्यात आली असून जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागत आहे. या चारही खेळाडूंच्या जागी बेन फोक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली स्टोन आणि क्रिस वोक्स यांचा समावेश करण्यात आला आहे.