IND vs ENG Test 2021: ‘तुम्हाला वाटलं मी ड्राय स्टेटमध्ये 5 दिवस राहिन?’: Ahmedabad टेस्टनंतर रवि शास्त्री यांची व्हायरल Meme वर विनोदी प्रतिक्रिया

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे सोशल मीडियावर बरेच मिम्स व्हायरल होत असतात आणि इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमधील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतरही नेटकऱ्यांनी संधी सोडली नाही आणि शास्त्री यांच्यावरील मिम्स शेअर केले. यामधील एका मिमवर शास्त्री यांनी विनोद प्रतिक्रिया दिली. प्रख्यात स्तंभलेखक आणि कादंबरीकार शोभा डे यांनी शास्त्रीवर एक मिम शेअर केला होता.

रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

IND vs ENG Test 2021: भारतीय संघाचे (Indian Team) प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांचे सोशल मीडियावर बरेच मिम्स व्हायरल होत असतात आणि इंग्लंडविरुद्ध (England) अहमदाबादमधील (Ahmedabad) तिसऱ्या कसोटी सामन्यानंतरही नेटकऱ्यांनी संधी सोडली नाही आणि शास्त्री यांच्यावरील मिम्स शेअर केले. यामधील एका मिमवर शास्त्री यांनी विनोद प्रतिक्रिया दिली. प्रख्यात स्तंभलेखक आणि कादंबरीकार शोभा डे (Shobha De) यांनी शास्त्रीवर एक मिम शेअर केला होता आणि त्यांच्या मद्यपान करण्याच्या सवयीची खिल्ली उडवली. "तुला वाटलं मी ड्राय स्टेटमध्ये पाच दिवस राहीन?" शास्त्री यांच्या फोटोवर या मिममध्ये म्हटले आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक यांनी विनोदपणे उत्तर दिले, "बँटर आवडले! या कठीण काळात हसू आणणे चांगले वाटते." गुरुवारी तिसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केल्यामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दिशेने एकपाऊल पुढे टाकले. (IND vs ENG Test Series 2021: अहमदाबादच्या निर्णायक चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी ‘या’ 3 विभागात करावी लागणार सुधार, वाचा सविस्तर)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात लोकल बॉय अक्षर पटेलने 11 विकेट्स घेत इंग्लिश संघावर दबदबा कायम ठेवला. दोन दिवसांतच भारतातील कसोटी सामना संपण्याची ही दुसरी वेळ आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 2018 मधील पहिला सामना होता जो अफगाणिस्तानचा देखील पहिला कसोटी सामना होता. शिवाय, कसोटी क्रिकेट इतिहासात दोन दिवसांत संपुष्टात येणार हा 22वा कसोटी सामना होता. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 81 धावांवर संपुष्टात आला. ही भारताविरुद्ध कसोटी सामन्यातील इंग्लंडची सर्वात छोटी धावसंख्या ठरली. कमी धावांच्या स्पर्धेत विजयासाठी 49 धावांचा पाठलाग करताना भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. आता चौथा कसोटी सामना 4 मार्च रोजी अहमदाबादच्या त्याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

दरम्यान, जून महिन्यात लंडनमधील लॉर्ड्स येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळण्यासाठी भारताला आता चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकणे किंवा ड्रॉ करणे गरजेचे आहे. न्यूझीलंडने यापूर्वी फायनलमध्ये प्रवेश मिळवला असून भारतासह ऑस्ट्रेलियादेखील फायनलसाठी शर्यतीत आहे. इंग्लंडने चौथा कसोटीस सामना ड्रॉ केल्यास टीम इंडियाचे स्वप्न भंग होईल आणि ऑस्ट्रेलियासाठी फायनलचे दरवाजे उघडतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now