IND vs ENG T20I 2021: पराभवा नंतरही नाही बदलणार भारतीय फलंदाजांची निर्भय शैली, इंग्लंडविरुद्ध रणनीतीचा श्रेयस अय्यरने केला खुलासा
या सामन्यात रिषभ पंतला पहिले फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते आणि श्रेयस पाचव्या क्रमांकावर आला होता.
IND vs ENG T20 2021: पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) इंग्लंडविरुद्ध (England) 8 विकेटने मोठा पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या (Team India) पराभवानंतर पहिल्या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला की जास्तीत जास्त आम्ही फिरकीपटूंसोबत खेळू आणि आमची रणनीती बदलणार नाही कारण ती आमची सर्वात मोठी ताकद आहे. इंग्लंडने भारताकडून मिळालेले 125 धावांचे लक्ष्य 27 शिल्लक असताना आणि 8 विकेटने राखून विजय मिळवला. अय्यरने एएनआयशी बोलताना म्हटले की, “सामन्यापूर्वी आम्ही या विकेटवर सराव केला होता आणि फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवर टर्न मिळाला. आमच्याकडे अजून ही योजना आहे की, जास्तीत जास्त फिरकी गोलंदाजांसह आम्ही मैदानावर येऊ कारण ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे आणि आम्ही त्यांचा सहकार्य करू.” (IND vs ENG 1st T20I 2021: भारताच्या लज्जास्पद पराभवानंतर Virat Kohli याने स्वीकारली चूक, पहा कोणावर फोडले पराभवाचे खापर)
या सामन्यात भारतीय संघ त्यांचे तीन आघाडीचे फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांच्यासमवेत तर इंग्लंड संघ आपले चार प्रमुख वेगवान गोलंदाज सॅम कुरन, क्रिस जॉर्डन, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांच्यासह मैदानावर उतरला होता. श्रेयस म्हणाला की, “आम्हाला दृष्टिकोनात कोणताही प्रकारे बदलण्याची गरज नाही. आमच्या फलंदाजी क्रमवारीत मोठे फटके खेळणाऱ्यांची कमी नाही. आमच्याकडे एक रणनीती होती जी आपण पाळणे आवश्यक होते कारण वर्ल्ड कपपूर्वी सर्व पर्याय पाहावे लागतील, जे आमच्यासाठी योग्य आहे.” या सामन्यात रिषभ पंतला पहिले फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते आणि श्रेयस पाचव्या क्रमांकावर आला होता. यावर मुंबईकर म्हणाला की “चिंता करण्याची गरज नाही कारण फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल आपल्याला थोडं लवचिक राहावे लागेल. मी माझी फलंदाजी बदलली नाही. हा फक्त विचार करण्यासारखा विषय होता आणि मी परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.”
विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात कोहलीने रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी आघाडीचे तीनही फलंदाज धावा करण्यात असमर्थ ठरले. शिखर धवन चार धावांवर बाद झाला असताना केएल राहुल एका धावच करू शकला. शिवाय, विराट खातेही उघडू शकला नाही. श्रेयसने 63 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 124 धावांपर्यंत पोहोचवली.