IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा दबदबा! इंग्लिश टीमविरुद्ध टेस्ट सामन्यात आतापर्यंत ठोकली आहे 5 शतके

यात त्याने 5 शतके केली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या 235 आहे. इंग्लंडचा संघ खूप मजबूत आहे आणि त्याच्याच भूमीवर विराटच्या कर्णधारपदाची कसोटी होणार आहे.

विराट कोहली (Photo Credits: Twitter/@BCCI)

Virat Kohli Test record vs England: विराट कोहली (Virat Kohli) ब्रेकनंतर इंग्लंडविरुद्ध (England) क्रिकेट मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर वैयक्तिक कारणास्तव विराटने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता आणि आता तो पुन्हा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. भारत दौऱ्यावर इंग्लंड (England Tour of India) चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, पण आता विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाला इंग्लंडवर मात करण्यात यशस्वी होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इंग्लंडचा संघ खूप मजबूत आहे आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदाची कसोटी त्याच्याच भूमीवर होणार आहे तसेच त्याच्यावर रहाणेप्रमाणे तेज दाखवण्याचा दबाव असणार आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीमचा आत्मविश्वास उंचावला असल्याने विराटसेना मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. (IND vs ENG Test 2021: टीम इंडियापुढे इंग्लंडचे कडवे आव्हान; जो रूट, जेम्स अँडरसन यांना रोखण्याचे मोठे चॅलेंज, वाचा सविस्तर)

इंग्लंडविरुद्ध विराटचा टेस्ट रेकॉर्ड आतापर्यंत चांगला राहिला होता आणि त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत इंग्लिश संघाविरूद्ध आतापर्यंत 19 टेस्ट मॅच खेळले आहे. यात त्याने 5 शतके केली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या 235 आहे. इंग्लिश संघाविरुद्ध विराटने 49.06 च्या सरासरीने 1570 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याबाबत बोलायचे तर सचिन तेंडुलकरने 32 सामन्यांत 7 शतकांसह 2535 धावा केल्या. शिवाय, विराटने सामन्यात दोन शतक केल्यास इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक वेळा शंभरी पार करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. सचिनऐवजी राहुल द्रविडनेही इंग्लिश टीमविरुद्ध 7 टेस्ट शतक केले आहे. शिवाय, 2020 सुरूवातीपासूनच कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फारशी फलंदाजी केलेली नाही. मागील वर्षी विराटने तीन कसोटी सामने खेळले आणि ज्यात तो प्रभावित होऊ शकला नाही. या दरम्यान त्याने एक अर्धशतक ठोकले ज्यात त्याच्या सरासरी 19.33 होती.

भारत आणि इंग्लंड संघातील टेस्ट सिरीज 5 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांचे आयोजन चेन्नई येथे हौल, तर अहमदाबादमधील नूतनीकरण केलेले मोटेरा स्टेडियम उर्वरित दोन सामने आयोजित करेल. मालिकेची तिसरी कसोटी एक दिवस/रात्र सामना असेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघात पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल.