IND vs ENG 1st Test 2021: युवा मोहम्मद सिराज की अनुभवी इशांत शर्मा? इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वेगवान गोलंदाज निवडीचा भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच
पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक स्टडीमवर खेळला जाईल ज्याची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदतगार असते.
IND vs ENG 1st Test 2021: ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आता इंग्लंडशी (England) दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून पहिली टेस्ट मॅच खेळली जाणार आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी भारताकडे अनेक पर्याय आहेत, पण गोलंदाजी विभागात अनुभवी इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि युवा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्यात दुसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी चुरस रंगली आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक स्टडीमवर (Chepauk Stadium) खेळला जाईल ज्याची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदतगार असते. अशा परिस्थितीत टीम इंडिया पहिल्या कसोटीत दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकते. बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर PTIला सांगितले की, ‘‘हे चेपाकच्या पारंपारिक खेळपट्टीसारखे आहे. यात इंग्लंडसारख्या विकेटची झलक दिसणार नाही. या दमट हंगामात आपल्याला विकेटवर गवत आवश्यक आहे जेणेकरून ते सहज तुटू नये. ही विकेट स्पिनर्सला नेहमीप्रमाणे मदत करेल.’’ (ICC World Test Championship Final: न्यूझीलंडला मिळालं फायनलचं तिकीट; भारत आणि इंग्लंड संघात दुसऱ्या स्थानासाठी रेस)
मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि कर्णधार विराट कोहली संघाच्या वेगवान हल्ल्यात जसप्रीत बुमराहच्या जोडीला कोणाची निवड करतात यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. इशांत जवळजवळ एक वर्ष रेड बॉल क्रिकेट खेळलेला नाही, तर ऑस्ट्रेलिया दौर्यावर सिराजने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने ब्रिस्बेन येथे एका डावात पाच विकेटसह तीन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान, इशांतने अलीकडेच प्रतिस्पर्धी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चार सामन्यांमध्ये एकूण 14.1 ओव्हर गोलंदाजी केली. आता इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये अनुभव की युवा जोश, कोण कोणावर भारी पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दुसरीकडे, संघ व्यवस्थापनासाठी दुसरा निर्णय जरा जास्तच अवघड असेल, ज्यात वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल या दोघांपैकी ज्येष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला साथ देण्यासाठी सामील केले जाऊ शकते. ब्रिस्बेनमध्ये पदार्पण सामन्यात वॉशिंग्टनने अर्धशतक झळकावले आणि चार गडी बाद केले, परंतु त्याच्या उपस्थितीत संघात दोन एकसारखे फिरकीपटू असतील पण त्याचा अनुभव खूप वेगळा असेल. अक्षर फलंदाजीतही आपले सामर्थ्य दाखवू शकतो तर तो रवींद्र जडेजाचा पर्यायदेखील असेल. अशास्थितीत संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या गोलंदाजांची निवड करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार असेल.