IND vs ENG Series 2021: 'टीम इंडिया' सर करण्यासाठी इंग्लंडची तयारी सुरु, हा तडाखेबाज ऑलराउंडर भारतासाठी रवाना, पहा Photo
भारताचा इंग्लंड दौरा (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG Series 2021: इंग्लंड (England) संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) भारत (India) दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. स्टोक्सला यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती, मात्र भारताविरुद्ध आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. स्टॉक्सने भारत रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि म्हटले आहे की "लवकरच भेटुया भारत." स्टोक्सने विमानाच्या आत बसलेला आपला फोटो शेअर करत भारतासाठी रवाना झाल्याची माहिती दिली. भारत दौर्‍यावर जाणार्‍या पहिल्या इंग्लिश खेळाडूंमध्ये स्टोक्सचा समावेश आहे, तर कर्णधार जो रुटसह त्याचा अन्य सहकारी सध्या श्रीलंकाविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी गाले येथे आहेत. भारताविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका पुढील महिन्यात सूर होईल, तर पहिले दोन सामने चेन्नईच्या (Chennai) एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील. विशेष म्हणजे या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थतीत राहण्याची परवानगी मिळणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) गुरुवारी भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सहा राखीव खेळाडूंसह 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. (IND vs ENG Test Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट मॅच प्रेक्षकांविना, चेपॉक स्टेडियमवर खेळले जाणार दोन्ही सामने)

स्टोक्स व्यतिरिक्त यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरदेखील संघात परतले आहेत. इंग्लंडने टीम इंडियाच्या घरच्या मैदानावर मजबूत आव्हान देण्यासाठी भक्कम संघ जाहीर केला आहे. इंग्लंड संघ सध्या श्रीलंकाविरुद्ध मालिकेचा दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंडने श्रीलंका संघाविरुद्ध त्यांच्या बर्‍याच खेळाडूंना विश्रांती दिली होती जे आता भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज आहेत. मागील वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये झालेल्या आयपीएल 2020 मध्ये स्टोक्स अखेर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता. वडिलांच्या आजारामुळे स्टोक्स लीगच्या पहिल्या सहामाहीला मुकला होता परंतु त्याच्या फ्रँचायझीत स्पर्धेच्या मध्यात सामील झाला होता आणि त्याने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या पण प्ले-ऑफसाठी पात्र ठरण्यास त्याच्या संघाला मदत करता आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ben Stokes (@stokesy)

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड संघः

जो रूट, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, बेन स्टोक्स, ओली स्टोन आणि क्रिस वोक्स.