IND vs ENG Series 2021: इंग्लंड संघाविरुद्ध ‘या’ 5 नवोदित खेळाडूंनी गाजवलं मैदान, आंतरराष्ट्रीय करिअरची केली दणक्यात सुरुवात

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात खेळाडूंनी केवळ वैयक्तिकच कामगिरी केली नाही तर मॅच-विनर देखील ठरले. आज आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्या दोन मालिकांमध्ये पदार्पणात छाप पाडली.

सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

IND vs ENG ODIs 2021: क्रिकेटमध्ये पदार्पणची दणक्यात सुरूवात करण्याचा भारताचा इतिहास खूप मोठा आहे. 1996 मध्ये कसोटी सामन्यात सौरव गांगुलीच्या 131 पासून कृणाल पांड्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळापर्यंत भारतीय (India) चाहत्यांनी सर्व आठवणी अगदी सांभाळून ठेवल्या आहेत. आयपीएल युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी व्यासपीठ बनत असताना, आता आंतराष्ट्रीय पदार्पणात खेळाडू संकोच करत नाही. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) हे सिद्ध देखील केले. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमारने इंग्लंडच्या घातक जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि नंतर प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) आपल्या डेब्यू वनडे सामन्यात चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन मोठ्या मालिका वेगळ्या असल्याचे सिद्ध झाले आहे. (IND vs ENG ODI 2021: टीम इंडियाचा फॅन नंबर-1! कोहली अँड कंपनीला चीअर करण्यासाठी गहुंजे हिल्सवर पोहचला सचिन तेंडुलकरचा चाहता, पहा Photos)

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात खेळाडूंनी केवळ वैयक्तिकच कामगिरी केली नाही तर मॅच-विनर देखील ठरले. आज आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्या दोन मालिकांमध्ये पदार्पणात छाप पाडली.

1. अक्षर पटेल

प्रदीर्घ फॉर्मेटसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर अखेर इंग्लंडविरुद्ध मालिकेत अक्षर पटेलला भारताकडून कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. रविंद्र जडेजाला दुखापत झाल्याने त्याला चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला फिरकी विभागात अश्विनला साथ देण्याचे काम देण्यात आले, पण शो-स्टॉपर म्हणून उदयास आला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या जेणेकरून संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यांनतर, देखील त्याने अखेर पर्यंत टीमसाठी चमकदार कामगिरी करत संघाला मालिका जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

2. सूर्यकुमार यादव

आयपीएलमधील कामगिरीबद्दल मुंबईच्या फलंदाजाने प्रसिद्धी मिळविली. परंतु भारताच्या मधल्या फळीतसाठी अनेक दावेदार असल्याने सूर्यकुमार यादवला संधीची प्रतीक्षा करावी लागली. त्याने तिसऱ्या इंग्लंड टी-20 सामन्यात पदार्पण केले पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवत महत्त्वपूर्ण चौथ्या टी-20 सामन्यात त्याला तिसर्‍या क्रमांकावर बढती दिली. त्याने संधीच सोनं करत 31 चेंडूत 57 धावांच्या जोरदार भारताला विजयी रेष ओलांडून दिली.

3. कृणाल पांड्या

टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अष्टपैलू क्रुणालला वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली. पण 30 वर्षीय क्रुणालला अखेर संधी मिळाली आणि त्याने आपली निवड सिद्ध करून दाखवली. क्रुणालने 31 धावांत 58 धावा फटकावल्या आणि 1 विकेट काढली.

4. प्रसिद्ध कृष्णा

जॉनी बेयरस्टोने सुरुवातीला केलेल्या धुलाईनंतर कृष्णाने पुनरागमन केले आणि चार विकेट घेतल्या ज्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय गोलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजी रेकॉर्डची नोंद केली. त्याच्या विकेटमुळे इंग्लंड फलंदाजी क्रमाला मोठा फटका बसला जेणेकरून भारताने 66 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

5. ईशान किशन

22 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने 5 सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताकडून पदार्पण केले. अंडर-19 वर्ल्ड कप आणि आयपीएलमध्ये व्हाईट-बॉल स्वरूपात सातत्य राखण्याचं किशनला भारताच्या पदार्पणाच्या रूपात फळ मिळालं. 32 चेंडूत 56 धावांची उत्तम संधी साधून युवा विकेटकीपर-फलंदाज आंतरराष्ट्रीय पातळीची आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif