IND vs ENG ODI 2021: टीम इंडियाचा फॅन नंबर-1! कोहली अँड कंपनीला चीअर करण्यासाठी गहुंजे हिल्सवर पोहचला सचिन तेंडुलकरचा चाहता, पहा Photos

व्यवसायाने शिक्षक असलेले सुधीर गेली अनेक वर्षे सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा उत्कट चाहते आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये, जेव्हा बीसीसीआयने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध सर्व एकदिवसीय सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुधीरने आपली इच्छा अनोखी शक्कल लढवली.

सुधीर कुमार चौधरी (Photo Credit: Facebook)

IND vs ENG ODI 2021: चाहते आणि फॉलोअर्स खऱ्या अर्थाने क्रिकेट किंवा कोणत्याही खेळासाठी महत्वपूर्ण असतात आणि जर अलिकडच्या वर्षांत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे एखादे चाहते असेल तर ते सुधीर कुमार चौधरी (Sudhir Kumar Chaudhari) आहेत. व्यवसायाने शिक्षक असलेले सुधीर गेली अनेक वर्षे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि भारतीय संघाचे (Indian Team) उत्कट चाहते आहेत. 2007 पासून ते टीम इंडियाच्या घरातील प्रत्यक्ष सामना पाहण्यासाठी उपस्थित असतात आणि परदेश दौऱ्यांसाठी निधीसुद्धा जमा करतात. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये, जेव्हा बीसीसीआयने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध (England) सर्व एकदिवसीय सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुधीरने आपली इच्छा अनोखी शक्कल लढवली. भारत-इंग्लंड संघातील वनडे मालिकेला प्रेक्षकांच्या स्टेडियममध्ये उपस्थितीला नकार मिळाल्याने भारतीय संघाचा हा चाहता कोहली अँड कंपनीला चीअर करण्यासाठी थेट गहुंजे हिल्सवर (Gahunje Hills) जाऊन पोहचला. (IND vs ENG 2021: कृणाल पांड्याने टीम इंडिया ड्रेसिंग रूममध्ये ठेवली वडिलांची ‘ही’ खास गोष्ट, हार्दिकसोबतच्या मुलाखतीत उघडले रहस्य Watch Video)

पुणे येथील पहिला वनडे सामना पाहतानाचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्टेडियममध्ये चाहत्यांच्या उपस्थितीला मनाई केली असल्यामुळे सुधीर स्टेडियम जवळील गहुंजे डोंगरावरुन तिरंगा फडकावत भारतीय संघाला प्रोत्साहन देताना दिसला होता. मूळचे बिहारचे असलेले सुधीर हे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्वात मोठे चाहते मानले जाते. सचिनच्या निवृत्तीनंतरही ते भारतीय संघाचे सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक आहे. सामन्याच्यावेळी शरीरावर तिंरगा रंगवून त्यावर सचिनचे नाव लिहिलेला आणि हातात तिरंग्यासह शंख घेऊन असलेले सुधीर अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

Team India Won the 1st ODI match against England. With out Audience

Posted by Sudhir Kumar Chaudhary on Tuesday, 23 March 2021

विशेष म्हणजे सुधीर भारतीय संघच नव्हे तर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या संनयनासाठी देखील हजेरी लावतात. आयपीएलची सुरुवात झाल्यावर सुधीरने मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्या ज्याच्या मागील सचिन हे कारण होते. सचिन सुरुवातीला संघाचा कर्णधार होता तर निवृत्तीनंतर मेंटॉर म्हणून संघासह कायम राहिला. इतकंच नाही तर तेंडूलकरने 2011 वर्ल्ड कप विजयानंतर ड्रेसिंगरुममध्ये सुधीरला बोलवलं आणि त्याच्याबरोबर आनंद साजरा केला होता. सचिनने त्याच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी देखील दिली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now