IND vs ENG 4th Test: फ्लॉप कामगिरीनंतर Rishabh Pant वर टांगती तलवार, ओव्हल कसोटीसाठी ‘या’ कारणामुळे रिद्धिमान साहा असला पाहिजे पसंती

त्याने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या 5 डावांमध्ये 17.40 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत. पंतला चौथ्या कसोटी सामन्यातही वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी ज्येष्ठ खेळाडू रिद्धिमान साहाला संधी दिली जाऊ शकते. साहा तांत्रिकदृष्ट्या अधिक योग्य असल्यामुळे त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे.

रिद्धिमान साहा, रिषभ पंत (Photo Credit: Getty)

IND vs ENG 4th Test: भारताचा (India) यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) फ्लॉप कामगिरी करत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या 5 डावांमध्ये 17.40 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंतची सर्वोत्तम धावसंख्या 37 आहे. सध्याच्या मालिकेत जेव्हाही संघाला पंतची गरज भासली तो बॅटने अपेक्षापूर्ती करण्यात अपयशी ठरला. तीनही कसोटी सामन्यांमधील त्याची शॉट निवड अत्यंत खराब होती. तो चेंडू खेळण्याच्या प्रक्रियेत बहुतेक वेळा बाद होऊन माघारी परतला. पंतच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहली त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार का, हा प्रश्न आहे. लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता टीम इंडियाला (Team India) कमबॅक करण्यासाठी रणनीतीत बदल करण्याची गरज आहे. पंतला चौथ्या कसोटी सामन्यातही वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी ज्येष्ठ खेळाडू रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) संधी दिली जाऊ शकते. (IND vs ENG 4th Test: ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळणार विश्रांती, टीम इंडियाला मिळू शकतो थोडा दिलासा)

एमएस धोनीने खेळाच्या प्रदीर्घ फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर साहाने विकेट्सच्या मागे जबाबदारी सांभाळली. साहा यष्टीरक्षक म्हणून प्रभावी ठरत असताना तो पुरेशा धावा करण्यात अपयशी ठरत होता. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया-भारत कसोटीनंतर साहाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. पंत फलंदाजीने प्रभावित झाला आणि त्याच्या विकेट्सच्या मागील कामगिरीत सुधारणा दाखवून आपली स्थिती मजबूत केली. पण आता, गोष्टी बदलू शकतात, किंवा किमान पंतचा फॉर्म पाहता साहाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. साहाने 38 कसोटी सामन्यात 29.09 च्या सरासरीने 1251 धावा केल्या आहेत. त्याचा आता प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो कारण तो फलंदाजीने तांत्रिकदृष्ट्या अधिक योग्य आहे आणि चेंडू सोडून क्रीजवर कब्जा करू शकतो - जे इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय, इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये पंत कधीही स्थिरावलेला दिसला नाही. तो नेहमी संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होता. अशी गोष्ट आहे जी सर्व वेळ काम करत नाही.

दरम्यान, मालिका आता 1-1 ने बरोबरीत आहे आणि आणखी दोन कसोटी सामने शिल्लक असताना दोन्ही संघात काही बदल अपेक्षित आहेत. 2 सप्टेंबरपासून ओव्हलवर सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की कोणाची निवड करते हे पाहणे मनोरंजक ठरेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif