IPL Auction 2025 Live

IND vs ENG 4th Test: ओव्हल मैदानात टीम इंडिया 50 वर्षांपासून विजयाच्या शोधात, यंदा ‘विराटसेना’ करणार अनपेक्षित कारनामा? जाणून घ्या रेकॉर्ड

लीड्समधील पराभवानंतर भारताला या सामन्यात परत उसळी घ्यायची आहे, पण ते सोपे होणार आहे आणि यामागील कारणही तसेच आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर एकमेव टेस्ट मॅच जिंकली होती आणि ती सुद्धा 50 वर्षांपूर्वी.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: लंडनच्या ओव्हल मैदानात (The Oval Ground) होणाऱ्या इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघातील चौथ्या कसोटी सामन्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. लीड्समधील पराभवानंतर भारताला या सामन्यात परत उसळी घ्यायची आहे, पण ते सोपे होणार आहे आणि यामागील कारणही तसेच आहे. भारतीय संघासाठी (Indian Team) आतापर्यंत ओव्हल मैदान फार भाग्यवान सिद्ध झालेले नाही आणि या मैदानावर टीम इंडियाचा (TeamIndia) रेकॉर्डही खूप खराब आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर एकमेव टेस्ट मॅच जिंकली होती आणि ती सुद्धा 50 वर्षांपूर्वी. भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर पहिला कसोटी सामना ऑगस्ट 1936 मध्ये खेळला गेला आणि इंग्लंडने त्या सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला. यानंतर, भारताने ऑगस्टमध्येच 1971 मध्ये या मैदानात विजयाचे झेंडा फडकावला होता. त्या विजयाला 50 वर्षे झाली आहेत आणि टीम इंडियाला इतकी वर्षे या मैदानावर जिंकण्याची तळमळ आहे. (IND vs ENG 4th Test: चौथ्या ओव्हल टेस्टपूर्वी टीम इंडियात मोठा उलटफेर, ‘या’ वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश)

ओव्हलबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही देश या मैदानावर 13 वेळा भिडले आहेत, ज्यात भारताने एक सामना जिंकला, तर इंग्लंडने पाच सामने जिंकले आणि 7 सामने अनिर्णित राहिले. या मैदानावर सप्टेंबर 2018 मध्ये दोन्ही देशांदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला गेला. हा सामना यजमान इंग्लंडने 118 धावांच्या फरकाने जिंकला. ओव्हल मैदानावरील भारताचा विक्रम निराशाजनक आहे, परंतु सध्याची टीम इंडिया थोडी वेगळी आहे. लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर भारत निःसंशयपणे लीड्समध्ये हरला, पण या संघ पुनरागमन करण्यास सक्षम आहे. दोन सप्टेंबरपासून या मैदानावर दोन्ही देशांमधील चौथा कसोटी सामना खेळला जाईल. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका एक-एक अशा बरोबरीत आहे. हेडिंग्ले येथे तिसऱ्या कसोटीत अपमानजनक डाव आणि 76 धावांनी पराभव पत्करावा लाग. विराट कोहली आणि कंपनी पहिल्या डावात 78 धावांवर ढेर झाली होती आणि नंतर चौथ्या दिवशी अवघ्या 63 धावांवर 8 विकेट्स गमावल्या ज्यामुळे इंग्लिश संघ मालिकेत बरोबरी करण्यात यशस्वी झाला.

तसेच भारतीय संघात ओव्हल मैदानावर पराभव टाळणे गरजेचे आहे कारण असे झाल्यास 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वातील संघाने 1-0 ने विजय मिळवल्यानंतर इंग्लंडमध्ये पहिली मालिका जिंकण्याच्या ‘विराटसेने’च्या आशा देखील संपुष्टात येतील. दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लिश कर्णधार जो रूटच्या फॉर्मवर देखील सर्वांच्या नजरा असतील. विराटने यंदाच्या मालिकेत फक्त एक अर्धशतक झळकावले आहे तर रूटने सलग तीन शतके ठोकली आहे. त्यामुळे रूट नावाच्या अडथळ्यांवर टीम इंडिया काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.