IND vs ENG 4th Test Day 2: विराट कोहलीचा नकोशा रेकॉर्ड-बुकमध्ये समावेश, अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड

अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दिवसाच्या सुरुवातीला मोठे धक्के बसल्यावर रिषभ पंतने तुफान फलंदाजी केली आणि इंग्लंडविरुद्ध संघाला 89 धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लिश टीमसाठी जेम्स अँडरसनने 3 तर बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. सामन्यादरम्यान काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Facebook)

IND vs ENG 4th Test Day 2: अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दिवसाच्या सुरुवातीला मोठे धक्के बसल्यावर रिषभ पंतने (Rishabh Pant) तुफान फलंदाजी  केली आणि इंग्लंडविरुद्ध (England) संघाला 89 धावांची आघाडी मिळवून दिली. मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर यजमान टीम इंडियाने 7 विकेट गमावून 294 धावा केल्या आहेत. पंतने एकाकी झुंज देत शंभरी गाठली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पंत अक्षर पटेल 11 धावा आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) 60 धावा करून खेळत होते. पंतने 118 चेंडूत 101 धावांची खेळी केली.  इंग्लिश टीमसाठी जेम्स अँडरसनने 3 तर बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. सामन्यादरम्यान काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 4th Test Day 2: रिषभ पंतने घेतला इंग्लंडचा समाचार, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाचा स्कोर 294/7; इंग्लंडविरुद्ध 89 धावांची आघाडी)

1. रोहित शर्माने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 49 धावांचा संयमी डाव खेळला. यादरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला सलामी फलंदाज ठरला.

2. रोहित खेळातील सर्वात प्रदीर्घ स्वरूपात देखील 17 डावात भारतासाठी 1000 धावा करणारा दुसरा वेगवान सलामी फलंदाज ठरला. भारताकडून विनोद कांबळीने 14 डावात ओपनर म्हणून वेगवान 1000 धावांचा रेकॉर्ड नोंदवला आहे.

3. रोहित शर्मा आता वर्ल्ड कसोटी चँपियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) उद्घाटना आवृत्तीत वेगवान 1000 धावा करणारा आशियाई खेळाडू ठरला आहे. रोहितने 11 डावात हा टप्पा गाठला तर संघाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 15 डावात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकहजारी धावसंख्या पूर्ण केली होती.

4. इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीला आज चकित करत शून्यावर बाद केले. यासह विराटने भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक 8 वेळा शून्यावर बाद होणाऱ्या माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली.

5. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक भारतीय म्हणून शून्यावर बाद होण्याच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीच्याही रेकॉर्डची बरोबरी केली. गांगुली आणि विराट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

6. रिषभ पंत भारतीय संघासाठी तारणहार बनून आला. संघ अडचणीत असताना पंतने 101 धावांची झुंजार खेळी केली. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक होते.

7. इंग्लंड अष्टपैलु बेन स्टोक्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीला अडचणीत पडले. स्टोक्सने कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 वेळा बाद केले आहे.

8. विराट कोहली चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खातेही खोलू उघडता आले नाही. विराट आपल्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंत 12 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

9. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत विराट सर्वाधिक दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. विराटनंतर या सामन्यात इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचा नंबर लागतो.

10. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 900 विकेट्स घेणारा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. अँडरसनपूर्वी ग्लेन मॅकग्राने 949 आणि वसीम अक्रमने 916 विकेट्स घेतल्या आहेत.

पंतला वगळता संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माने 49 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंड गोलंदाजांना दिवसाला चांगली सुरुवात मिळाली पण, पंतने अखेरच्या क्षणी त्यांची लय बिघडवली. पंतने आपल्या खेळीत 118 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावांची शतकी खेळी केली. शिवाय, त्याने सुंदरसह सातव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारीही केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now